Share

महायुतीकडून शाहू महाराजांचा अपमान; महाराज खरे वारसदार नसल्याचा दावा

 Satej Patil vs Sanjay Mandlik : संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे वादग्रस्त विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. यानंतर महाराष्ट्रात शाहूप्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यावर आता सतेज पाटील यांनी मंडलिक यांना धारेवर … Read more

Published On: 

 Satej Patil vs Sanjay Mandlik : संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे वादग्रस्त विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. यानंतर महाराष्ट्रात शाहूप्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

यावर आता सतेज पाटील यांनी मंडलिक यांना धारेवर धरले आहे, ते म्हणाले ”शाहू महाराज यांच्यावरील टीका संजय मंडलिक स्वत:च्या स्वार्थासाठी वक्तव्ये करत आहेत, कोल्हापूरकर अपमान सहन करणार नाहीत, सुरुवात त्यांनी केलीय, शेवट कोल्हापूरची जनता करेल अशा शब्दात काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी फटकारले आहे.

कोल्हापूरकर हा अपमान सहन करणार नाहीत, हा छत्रपती घराण्याचा अपमान केला आहे. कुठल्याही परिस्थितीत जनता भीक घालणार नसल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलतांना सतेज पाटील म्हणाले की, यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे.  कोण सल्लागार आहेत माहीत नाही की स्वत: आहेत माहीत नाही. कुस्ती करा पण खालच्या पातळीवर टीका योग्य नसल्याचे सतेज पाटील म्हणाले.

शाहू महाराजांवरील टीकेला कोल्हापूरची जनता योग्य उत्तरे देईल. शाहूप्रेमी याचा निषेध व्यक्त करतील. महाराजांवर आम्ही वैयक्तिक टीका करणार नाही, असे मंडलिक म्हणाले होते. त्यांची वक्तव्ये पब्लिक डोमेनमध्ये आहेत, मग आता चिट्टी कोणी लिहून दिली का? असा टोला त्यांनी लगावला. कोल्हापुरी भाषेत उत्तर द्यायची वेळ आल्यास देऊ, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला.

संजय मंडलिक नेमके काय म्हणाले?

“आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहेत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला”

मल्लाला हातचं मारायचा नाही. मल्लाला टांग मारायची नाही. मग कुस्ती होणार कशी? असा सवाल संजय मंडलिक यांनी उपस्थित केला.

Shahu Maharaj Satej Patil vs Sanjay Mandlik

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही