🕒 1 min read
Pune Police Raid : शहरातील हॉटेल आणि पब मध्यरात्री दीडपर्यंत सुरू ठेवण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली आहे. पोलीस आयुक्तांचे आदेश धुडकावून येरवडा भागात मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या पबवर गुन्हे शाखेने छापा टाकला. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याणीनगर भागातील सेरेब्रम इमारतीत एलोरा पब आहे. मध्यरात्री दीडनंतर एलोरा पब सुरू होता. याबाबतची माहिती गस्त घालणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली.
पथकाने तेथे छापा टाकला. तेथून ध्वनिवर्धक यंत्रणा, हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येरवडा परिसरातील एलोरा आणि युनिकॉर्न या दोन पबवर कारवाई करून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अमन इदा शेख ( लोहगाव), संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे (शिवाजीनगर), रश्मी संदेश कुमार (औंध), सुमीत चौधरी (लोहगाव) प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, नागरीकांनी मात्र पोलिसांवरच टीका केली आहे. ही कारवाई तुटपुंजी असल्याचे सांगत काही दिवसातच हे पब पुन्हा जोमाने चालू होतील. पुण्यातील राजा बहादूर मिल मधील पब वरही अशी कारवाई करावी. शनिवार आणि रविवारी येथील पब रात्रभर चालू असतात. तिथे बेकायदेशीर हुक्का फुकला जातो, इंस्टाग्राम वर अनेक तरुणांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, असेही नागरिकांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गप्प बसतोय म्हणून वळवळ करू नका’; अजित पवारांचा भावंडांना इशारा
- माझ्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत- प्रकाश आंबेडकर
- संजय लीला भन्साळी यांच्या हिरमंडी वेब सीरिजमध्ये फरदीन खान करणार तब्बल १४ वर्षाने कमबॅक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











