Ajit Pawar पुणे : माझ्या निवडणुकीत माझी भावंडे कधीच फिरली नाहीत इतकी गरागरा या निवडणुकीच्या निमित्ताने फिरत आहेत. निवडणूक संपल्यानंतर यापैकी एकही तिकडे फिरणारसुद्धा नाहीत. अजित पवार आणि त्याचे कार्यकर्तेच लोकांचे प्रश्न समजून घेणार आहेत हे कोणीही विसरू नका.
पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तशा या छत्र्या आहेत. काही दिवसांनी परदेशात हवाई सफर करायला ते निघून जातील. मी गप्प बसतोय याचा अर्थ तुम्ही फार वळवळ करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावंडांना प्रत्युत्तर दिले. मी तोंड उघडले तर तुम्हाला फिरता येणार नाही, हे विसरू नका, असा इशारा त्यांनी दिला.
अजित पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी कोणाकोणाचे दूरध्वनी आले हे विजय शिवतारे यांनी माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखविले. हे दूरध्वनी कोणाचे आहेत हे पाहिल्यानंतर राजकारण कोणत्या पातळीवर आले आहे, याची मला जाणीव झाली.
ज्यांच्यासाठी मी जीवाचे रान केले त्यांनीच अशा पद्धतीने माझ्या विरुद्ध गोष्टी करणे हे दु:खदायक होते. हृदयात कुठेतरी दुखते म्हणून हे सगळं बोलावे लागत आहे.
महत्वाच्या बातम्या