Share

आंदोलकांवरील कारवाईवर राहुल गांधी भडकले; म्हणाले, ‘आम्ही सर्व बाजूंनी चाल करून येतोय, घाबरू नका!’

दिल्लीत आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला. आम्ही माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Published On: 

Parliament debate on FCRA Bill 2026

दिल्ली, 10 ऑक्टोबर: दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सीजेपीचे मुख्य नेते अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अटकेनंतर गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल यांचा उल्लेख या संपूर्ण प्रकरणातील ‘खलनायक’ असा केला आहे. ते म्हणाले की, हे सर्वजण आता सर्व बाजूंनी कोंडीत सापडले असून त्यांच्याभोवतीचा फास आवळला जात आहे.

सरकारला थेट आव्हान देताना गांधी यांनी स्पष्ट केले की, ‘तुम्हाला जे करायचे आहे ते करा. १० हजार, २० हजार किंवा ५० हजार पोलीस तैनात करा. सर्व नेत्यांना, तरुणांना आणि आम्हा सर्वांना अटक करा. पण आम्ही मागे हटणार नाही.’ देशाच्या संविधानाचे आणि नागरिकांच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आपण लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

गेल्या एका दशकाहून अधिक काळ आपण नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या साथीदारांविरोधात लढा देत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘एखाद्या प्रतिस्पर्ध्याचा जसा सखोल अभ्यास केला जातो, तसाच मी माझ्या विरोधकांचा केला आहे. मला त्यांची प्रत्येक चाल आणि नसन् नस माहीत असून त्यांचा भ्याडपणा हेच त्यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे,’ असा घणाघात त्यांनी केला.

आंदोलक तरुणांना उद्देशून ते म्हणाले की, ‘घाबरू नका. आम्ही सर्व बाजूंनी चाल करून येत आहोत आणि माघार घेणार नाही. तुम्ही जे आंदोलन करत आहात, त्याचा मला अभिमान आहे. तुमचा लढा असाच सुरू ठेवा, आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत.’ गेल्या १० ते १५ वर्षांत देशाची जी परिस्थिती झाली ती पुन्हा होऊ देणार नाही आणि संविधानावर हल्ला करणाऱ्यांचा आपण निश्चितपणे पराभव करू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही