Share

तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने तणाव वाढला; आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल

सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलनापूर्वी तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Published On: 

Aaditya Thackeray and Sanjay Raut outside DN Nagar Police Station after Tushar Gandhi detention

प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: सीजेपीच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनापूर्वी पोलिसांनी तुषार गांधी (Tushar Gandhi) यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईचे तीव्र पडसाद उमटले असून, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी तात्काळ डीएन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तुषार गांधी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांच्यासोबत यावेळी अनिल परब हे देखील उपस्थित होते.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “ही पोलीस स्टेशन आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुषार गांधींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आपण तेथे पोहोचत असतानाच पोलिसांनी त्यांना तेथूनही नेल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी गांधी यांची सुटका करावी, अशी मागणी करत आदित्य ठाकरे यांनी इशारा दिला की, “रस्त्यावर हे सगळं चिघळण्याच्या आधी पोलिसांनी तुषार गांधींना सोडलं पाहिजे. नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र शिवसैनिक रस्त्यावर उतरेल.” दरम्यान, सध्या डीएन नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात कलम १४४ नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही