Politics
दुष्काळात अधिकाऱ्यांची ५ कोटींची लंडनवारी; आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांवर जोरदार हल्लाबोल
दुष्काळात उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ५ कोटी रुपये खर्च करून लंडनवारी केल्याने आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.
एकनाथ खडसे अपघाती मंत्री, स्वतःच्या पक्षाशीच केली गद्दारी; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्लाबोल
एकनाथ खडसे हे अपघाती मंत्री असून त्यांनी स्वतःच्या पक्षाशी गद्दारी केली आहे, अशी बोचरी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर दाखल करा; रोहित पवारांचे पुणे पोलिसांना थेट आव्हान
एमपीएससी विद्यार्थ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून रोहित पवार आक्रमक झाले असून, खोटे गुन्हे दाखल करायचे असतील तर माझ्यावर करा, असे आव्हान पुणे पोलिसांना दिले आहे.
‘आपण एकत्र यायचं का?’ सुप्रिया सुळेंच्या घरी पार्थ पवारांना विचारल्याचा युगेंद्र पवारांचा गौप्यस्फोट
सुप्रिया सुळे यांच्या घरी झालेल्या भेटीत आपण पार्थ पवार यांना दोन्ही गट एकत्र येण्याबाबत विचारल्याचे युगेंद्र पवार यांनी उघड केले आहे.
MPSC पेपरफुटीच्या न्यायालयीन चौकशीची शासनाची तयारी; मात्र अध्यक्षांचा राजीनामा का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यास राज्य सरकार तयार आहे. मात्र, हे आंदोलन राजकीय असून न्यायालयाचा अवमान असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधान परिषदेच्या ५ जागांचे चित्र स्पष्ट: कोण कोणाविरोधात लढणार? कुठे झाली बंडखोरी?
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. यानंतर लढतीचे आणि बंडखोरीचे चित्र स्पष्ट झाले असून दोन्ही आघाड्यांची धाकधूक वाढली आहे.
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी करणार? स्वतःच खुलासा करत मांडली स्पष्ट भूमिका
गजानन कीर्तिकर यांनी आपण दलबदलू नसून ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, विद्यमान पक्षप्रमुखांशी संपर्क होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सतत गैरहजर राहणाऱ्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा दणका; १ हजारांचा दंड आणि वॉरंटचा इशारा
२०१६ मधील एका खटल्यात सतत गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना १ हजारांचा दंड आणि वॉरंटचा इशारा दिला आहे.
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा…; विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकत राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला असून, पेपरफुटी आणि प्रशासकीय गलथान कारभारावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
निवडणूक आयोगाची ‘SIR’ मोहीम थांबवणे शक्य; मतदार वगळणुकीच्या चौकशीची अशोक लवासा यांची अपेक्षा
निवडणूक आयोगाची एसआयआर मोहीम थांबवणे शक्य असून मोठ्या प्रमाणावरील मतदार वगळणुकीचा निवडणुकांवर काय परिणाम झाला, हे तपासण्याची गरज अशोक लवासा यांनी व्यक्त केली.














