Share

IND vs NZ: भारताला धूळ चारण्यासाठी न्यूझीलंडचा ‘हा’ आहे गेमप्लॅन; Playing 11 मध्ये मोठे बदल!

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी न्यूझीलंडची प्लेइंग ११ जवळपास निश्चित झाली आहे. कर्णधार मायकल ब्रेसवेलसह डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्सवर संघाची मोठी मदार असेल.

Published On: 

New Zealand Playing 11 vs India | Shubman Gill | ind vs nz

🕒 1 min read

IND vs NZ- भारताला त्यांच्याच घरात हरवणं, हे भल्याभल्यांना जमत नाही. पण न्यूझीलंडने २०२४ च्या कसोटी मालिकेत हे करून दाखवलं होतं, हे विसरून चालणार नाही. आता पुन्हा एकदा ‘ब्लॅककॅप्स’ भारताला वनडेत धक्का देण्याच्या तयारीत आहेत का? ११ जानेवारीला होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी न्यूझीलंडने आपली रणनीती आखली असून, त्यांच्या Playing 11 चे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.

न्यूझीलंडचा सध्याचा फॉर्म पाहिला तर त्यांनी मागील दोन वनडे मालिका खिशात घातल्या आहेत. पण भारतात आव्हान सोपं नसतं. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ थोडा अनअनुभवी वाटत असला, तरी त्यांचा ‘जोश’ मात्र हाय आहे.

सलामीला कोण येणार?

डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी अनुभवी डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) आणि विल यंग यांच्या खांद्यावर असेल. कॉनवे हा भारताच्या खेळपट्ट्या चांगल्या ओळखतो, तर विल यंगला २०२३ वर्ल्ड कपचा अनुभव आहे. त्यामुळे या दोघांनी पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात करून देणं किवींसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

मधल्या फळीत ‘या’ खेळाडूंचा बोलबाला 

न्यूझीलंडकडे डॅरिल मिचेल आणि हेन्री निकोल्ससारखे खमके फलंदाज आहेत. डॅरिल मिचेल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तो एकहाती सामना फिरवू शकतो. त्याला साथ द्यायला ग्लेन फिलिप्स असेलच. २०२४ च्या विजयात फिलिप्सने बॅट आणि बॉलने जी कमाल केली होती, ती आजही भारतीय चाहते विसरलेले नाहीत.

कॅप्टन ब्रेसवेल (Michael Bracewell) आणि गोलंदाजीची धार संघाचं नेतृत्व मायकल ब्रेसवेलकडे आहे. तो आणि ग्लेन फिलिप्स फिरकीची धुरा सांभाळतील. तर वेगवान गोलंदाजीचा भार काईल जेमिसन, झॅक फाउल्क्स आणि मायकल रे यांच्यावर असेल. विशेष म्हणजे आदी अशोक या फिरकीपटूकडे सर्वांचं लक्ष असेल. भारताच्या तगड्या बॅटिंग लाईनअपला रोखण्यासाठी या गोलंदाजांना आपल्या भात्यातील सर्व अस्त्रे बाहेर काढावी लागतील.

New Zealand Playing 11

डेव्हॉन कॉनवे (wk), विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, जोश क्लार्कसन, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल (c), झॅक फाउल्क्स, मायकल रे, काईल जेमिसन, आदी अशोक.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)