नागपूर, 10 ऑक्टोबर: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीतील आंदोलनाची मोदी सरकारने धास्ती घेतली आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून हजारो जवान तैनात करण्यासह दिल्लीतील इंटरनेट, रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. मोदी सरकारचे हे दबावतंत्र आणि हिटलरशाही इंग्रजांपेक्षाही अधिक क्रूर असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
लोकशाहीत आता पारदर्शकता उरलेली नाही. मतदान प्रक्रियेवर जनतेचा आधीपासूनच संशय होता, मात्र आता सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत मत व्यक्त केले आहे. त्यामुळे हे सरकार जनतेच्या मतांवर नव्हे, तर ‘मतचोरी’ करून सत्तेत आल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाच्या या कारभाराविरोधात आता देशभरात आंदोलनाचा भडका उडणार असल्याचा इशारा पटोले (Nana Patole) यांनी दिला.
नागपुरात सुरू असलेल्या पिंडदान आंदोलनावर बोलताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या देशासाठी बलिदान देणाऱ्या नेत्यांबद्दल भाजपच्या डोक्यात पाप आहे. मोदी आणि निवडणूक आयोग जे करत आहेत, त्यावर संघाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, नागपुरातून उगम पावलेल्या संघात सध्या अंतर्गत दंगल सुरू असून आगामी काळात यातून मोठी आग पेटेल, असा दावाही त्यांनी केला.
भंडारा येथील एका धक्कादायक घटनेचा संदर्भ देत पटोले यांनी सरकारच्या क्रूरतेवर बोट ठेवले. पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासमोर एका शेतकऱ्याने आपला टाहो फोडला होता, मात्र त्यानंतर दोनच दिवसांत त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. यावरून हे सरकार किती असंवेदनशील आणि हुकूमशहा आहे, हेच सिद्ध होते, असे पटोले म्हणाले.
सद्यस्थितीत प्रस्थापित व्यवस्थेबद्दल बहुजन समाजात तीव्र संताप आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर होत असल्याने तिथे आपला विजय निश्चित आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी नक्कीच विजयी होतील, असा ठाम विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील सीजेपी आंदोलनावरील कारवाईवरून राज ठाकरेंचा संताप; मोदी-शहांना दिला थेट इशारा
- नाना पाटेकरांच्या मृत्यूचं खरं कारण समोर; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून मोठा खुलासा
- कतरिना कैफचा ग्लॅमरस लूक चर्चेत; वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









