प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला नुकतेच तिच्या वाढलेल्या वजनावरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र, आता तिने आपल्या नव्या ग्लॅमरस फोटोंच्या माध्यमातून टीकाकारांची बोलती बंद केली आहे. कतरिनाने (Katrina Kaif) लंडनमध्ये एका ब्लॅक आउटफिटमधील आपले स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
कतरिना आपल्या ‘के ब्युटी’ या ब्रँडच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका प्रमोशनल कार्यक्रमासाठी लंडनला गेली होती. ‘नायका’ (Nykaa) सोबत भागीदारी करून तिने या ब्युटी ब्रँडची सुरुवात केली होती. यूकेमध्ये ‘के ब्युटी’च्या वर्धापनदिनाचे सेलिब्रेशन करत असल्याचे तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगत आपला आनंद व्यक्त केला आहे.
२०२१ मध्ये अभिनेता विक्की कौशलसोबत विवाहबंधनात अडकलेल्या कतरिनाने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलगा विहान कौशलला जन्म दिला. आई झाल्यानंतर तिच्या पोस्टपार्टम वजनावरून समाजमाध्यमांवर चर्चा सुरू होती. अलीकडेच अंबानी कुटुंबाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल केले होते.
मात्र, कतरिनाच्या या नव्या आणि आत्मविश्वासपूर्ण लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिच्या या फोटोंवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून एकाने ‘कतरिना कैफचा क्लासी लूक’ अशी दाद दिली आहे. तर काहींनी तिच्या स्टाईलला ‘आयकॉनिक’ म्हणत तिला जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हटले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कंगना रणौतची राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाली, “नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी अवस्था”
- CJP चं दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच निवडणूक आयोगाचे धडाधड निर्णय; फॉर्म ६ आणि ७ बाबत मोठा बदल
- तनुश्री दत्ताच्या समर्थनार्थ गायिका चिन्मयी श्रीपदा मैदानात, म्हणाली, ‘मृत्यूमुळे कुणी देवदूत बनत नाही!’
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








