पुणे, 16 ऑक्टोबर: पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधील माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात मोठा वाद झाला. या घटनेनंतर दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप करत बंडगार्डन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.
आमदार शेळके हे दुपारी तीन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. तिथे सुनील गुजर यांना पाहिल्यानंतर शेळके संतापले. त्यांनी गुजर यांना एका खोलीत नेले आणि त्यांच्याकडील बॅग हिसकावून तपासली असता, त्यात आमदारांशी संबंधित कागदपत्रे सापडल्याचा दावा करण्यात आला. यावर गुजर यांनी आरोप केला आहे की, शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅग ओढून घेत आपल्याला एका खोलीत नेले आणि तिथे मारहाण केली.
मारहाणीचे हे सर्व आरोप आमदार शेळकेंनी फेटाळून लावले आहेत. मारहाण झाली असेल तर त्यांनी जखमा दाखवाव्यात, असे आव्हान देत त्यांनी पोलीस तपासात सर्व सत्य उघड होईल असे म्हटले आहे. दुसरीकडे, गुजर हे गेल्या दीड-दोन वर्षांपासून आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा दावा शेळके यांनी केला आहे. गुजर हे दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करून आपली माहिती काढतात आणि ती विरोधकांसह गुन्हेगारांना पुरवतात, असा खळबळजनक आरोप आमदारांनी केला आहे. आपली कागदपत्रे कशासाठी ठेवली आणि ही माहिती कोणाला दिली जात होती, याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. पोलिसांच्या माहितीनुसार, गुजर यांना खोलीत घेऊन जाईपर्यंतच्या चित्रणात आमदारांनी त्यांना कोणताही स्पर्श केल्याचे दिसत नाही. मात्र, ज्या खोलीत मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाही. त्यामुळे मारहाणीबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे दत्तक घेणार अंतरवाली सराटी गाव, जिल्हाधिकाऱ्यांची मोठी घोषणा
- अन्याय होऊ देणार नाही, मी पाठीशी उभा आहे; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा राम पूर्णेकरांना शब्द
- पेणवर शिवसेनेचा दावा; ‘पुढचा आमदार आपलाच’, नवनिर्वाचित तालुकाप्रमुख संजय म्हात्रेंचे भाजपला आव्हान
Quick Answers
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा वाद झाला. या घटनेनंतर दोघांनीही बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकमेकांवर परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.
गुजर यांनी असा आरोप केला आहे की, आमदार शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅग ओढून घेत आपल्याला एका खोलीत नेले आणि तिथे मारहाण केली.
गुजर हे गेल्या दीड-दोन वर्षांपासून आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा दावा शेळके यांनी केला आहे. तसेच गुजर दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करून माहिती काढतात आणि ती विरोधकांसह गुन्हेगारांना पुरवतात, असा आरोपही शेळके यांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुजर यांना खोलीत घेऊन जाईपर्यंतच्या चित्रणात आमदारांनी त्यांना कोणताही स्पर्श केल्याचे दिसत नाही. ज्या खोलीत मारहाणीचा आरोप आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे मारहाणीबाबत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








