प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम पूर्णेकर यांची भेट घेऊन त्यांना आधार दिला आहे. 'तुझ्या वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,' असा शब्द फडणवीस यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस आज ठाण्यातील टेंभी नाका येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते. याच वेळी ही महत्त्वाची भेट झाली. आमदार संजय केळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून राम पूर्णेकर आणि फडणवीस यांची ही भेट घडवून आणण्यात आली.
या भेटीदरम्यान हत्या प्रकरणातील पुढील तपास आणि कुटुंबाला मिळणाऱ्या न्यायप्रक्रियेबाबत चर्चा झाल्याचे समजते. फडणवीस यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, दोन दिवसांनंतर राम पूर्णेकर आणि मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा भेट होणार असल्याचे ठरले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाली असून, या हत्येचा आरोप मीनाक्षी शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू असून काही आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे. आता आगामी भेटीत काय चर्चा होते आणि कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पेणवर शिवसेनेचा दावा; ‘पुढचा आमदार आपलाच’, नवनिर्वाचित तालुकाप्रमुख संजय म्हात्रेंचे भाजपला आव्हान
- नागपुरात विद्यार्थिनींना धार्मिक संदेश पाठवणाऱ्या प्राध्यापकावर कारवाईची मागणी; विहिंपची पोलिसांत धाव
- पुणे शिक्षक मतदारसंघ: शिवसेनेचा अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा, भाजप-शिंदे गट आमनेसामने
Quick Answers
'तुझ्या वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,' असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिला आहे.
ही भेट ठाण्यातील टेंभी नाका येथे झाली. आमदार संजय केळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून ही भेट घडवून आणण्यात आली.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा आरोप मीनाक्षी शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे आणि सध्या याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







