पेणवर शिवसेनेचा दावा; ‘पुढचा आमदार आपलाच’, नवनिर्वाचित तालुकाप्रमुख संजय म्हात्रेंचे भाजपला आव्हान

पेण तालुकाप्रमुखपदी नियुक्ती होताच संजय म्हात्रे यांनी भाजपला आव्हान देत आगामी निवडणुकीत पेणमधून शिवसेनेचाच आमदार निवडून आणण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: शिवसेना शिंदे गटाच्या पेण तालुकाप्रमुखपदी संजय म्हात्रे यांची नियुक्ती होताच त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पेण मतदारसंघातून शिवसेनेचाच आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी या जागेवर दावा सांगितला आहे. महायुतीमध्ये सध्या हा मतदारसंघ भाजपकडे असला तरी, ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आपण वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

पेणमध्ये सध्या भाजपची ताकद आणि त्यांचाच आमदार असला तरी, राजकीय प्रवाह वेगाने बदलत असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. 'आमची महायुती आहे; मात्र शिवसेनेची ताकद वाढत असून, आगामी निवडणुकीत आम्ही भाजपपेक्षा दोन पावले पुढे असू. मामांचे स्वप्न पूर्ण करून पेणमधून शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याचे माझे ध्येय आहे,' असे ते म्हणाले. पेणच्या जागेसाठी दोन्ही पक्षांनी एक समिती नेमून सर्वेक्षण करावे आणि ज्याची ताकद अधिक असेल त्याला ती जागा मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मुख्य नेते एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र दळवी आणि मानसी दळवी यांनी टाकलेल्या विश्वासाला प्रामाणिकपणे पात्र ठरणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. सुधागडमध्ये धनश्री पाटील आणि राष्ट्रवादीचे किशोर जैन यांच्यावर मात केल्याचा दाखला देत त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक वाढीकडे लक्ष वेधले. पक्षात फूट पडून दोन शिवसेना झाल्या असल्या तरी आपली ताकद कमी झालेली नसून ती वाढतच असल्याचे ते म्हणाले.

तरुणांचा पक्षाकडे ओढा वाढत असून पेण, सुधागड आणि रोहा तालुक्यांतील प्रत्येक गावात शाखा सुरू करून संघटन मजबूत करणार असल्याचे म्हात्रे म्हणाले. तसेच लवकरच मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, संजय म्हात्रे यांच्या नियुक्तीची घोषणा करताना आमदार महेंद्र दळवी यांनीही आगामी निवडणुकीबाबत शिवसेनेची महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली. तालुकाप्रमुखाचे पद हे आमदाराइतकेच प्रतिष्ठेचे व महत्त्वाचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, रायगड जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे तीन आमदार असून आगामी काळात ही संख्या पाचवर नेण्याची अपेक्षा आहे. 'संपूर्ण कोकणात शिवसेनेची ताकद आहे. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले आमदार नाहीत, तिथे आपल्या पक्षाचा आमदार निवडून आला पाहिजे,' असे दळवी यांनी स्पष्ट केले.

पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार होणे ही काळाची गरज असल्याचे महेंद्र दळवी यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढून पक्षाने मिळवलेल्या बहुमताचा दाखला देत, योग्य नियोजन आणि संघटनात्मक बांधणीच्या जोरावर पेणमध्ये शिवसेनेचा आमदार सहज निवडून येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकीकडे म्हात्रे यांचा पेणवर दावा तर दुसरीकडे दळवींचे जिल्ह्यात आमदार वाढवण्याचे लक्ष्य, यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

शिवसेना शिंदे गटाच्या पेण तालुकाप्रमुखपदी संजय म्हात्रे यांची नियुक्ती झाली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही