नागपुरात विद्यार्थिनींना धार्मिक संदेश पाठवणाऱ्या प्राध्यापकावर कारवाईची मागणी; विहिंपची पोलिसांत धाव

नागपुरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थिनींना एका विशिष्ट धर्माचे संदेश पाठवून त्या धर्माची उपासना पद्धत पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

Published On: 

MHD LOGO

नागपूर, 16 ऑक्टोबर: नागपुरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थिनींना एका विशिष्ट धर्माचे संदेश पाठवून त्या धर्माची उपासना पद्धत पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) एका शिष्टमंडळाने आज थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी त्यांच्या संघटनेशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली होती. संबंधित प्राध्यापकाने काही विद्यार्थिनींना आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा, तसेच विशिष्ट धर्माच्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे आणि नियमांचे पालन करावे यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे धार्मिक भावनांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याचे विहिंपने म्हटले आहे.

या तक्रारीनंतर विहिंपच्या शिष्टमंडळाने प्रथम महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. मात्र, या गंभीर प्रकरणात अद्याप पीडित विद्यार्थिनी, तिचे कुटुंबीय किंवा महाविद्यालय प्रशासन यापैकी कुणीही पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.

संबंधित प्राध्यापकावर तातडीने कारवाई करून त्याला महाविद्यालयातून हटवावे, अशी मागणी विहिंपने केली आहे. जर हा प्राध्यापक दोषी नसेल, तर एका पीडित मुलीचे कुटुंबीय महाविद्यालयात चौकशीला गेले असताना तो हात जोडून माफी का मागत होता, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे. महाविद्यालय प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये आणि योग्य पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विहिंपकडून देण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

प्राध्यापकाने विद्यार्थिनींना एका विशिष्ट धर्माचे संदेश पाठवून त्या धर्माची उपासना पद्धत पाळण्यासाठी, धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही