शिक्षक-पदवीधर निवडणूक: अमरावतीतील बंडखोरीवरून महायुतीत कुरघोड्या, शिवसेना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शिक्षक व पदवीधर निवडणुकीत अमरावतीतील बंडखोरीवरून महायुतीमध्ये कुरघोड्या सुरू आहेत. पुणे, संभाजीनगरबाबत शिवसेना आक्रमक असून, दुसरीकडे वंचितच्या उमेदवाराची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या उघड झाल्या आहेत. काही ठिकाणी बंडखोरी थोपवण्यात यश आले असले तरी, उर्वरित जागांवर तिन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. यामुळे ऐन निवडणुकीत महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे.

एकूण पाच जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत अमरावतीमधील घडामोडींमुळे पुणे शिक्षक आणि संभाजीनगर मतदारसंघात युतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराने आव्हान उभे केले आहे. यावर कुरघोडी म्हणून पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे.

तसेच, अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला साथ दिल्यास, बदल्यात संभाजीनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादीला मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरावतीतील भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली असून, ही बंडखोरी शमवण्यासाठी शिवसेनेकडून दबाव वाढवण्यात आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत आज अमरावती दौऱ्यावर आहेत.

दुसरीकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद गाझी यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा धक्का दिला आहे. उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. या निर्णयाविरोधात गाझी यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मतपत्रिकांची छपाई पूर्ण झाली असल्याने आता निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मर्यादा आहेत, असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने गाझी यांची याचिका फेटाळून लावली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही