दिल्ली, 16 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) 'लहरा दो तिरंगा' आंदोलनाला आज अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र, या यात्रेपूर्वी दिल्लीला अक्षरशः लष्करी छावणीचे स्वरूप आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात तब्बल २७ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण परिसरात कलम १६३ (यापूर्वीचे कलम १४४) लागू करण्यात आले आहे.
यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे हे आंदोलन पूर्ण होऊ शकले नव्हते. आता सहा दिवसांनंतर जंतरमंतरऐवजी कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कमध्ये ही रॅली निघणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि सीजेपी नेते आशुतोष रांका व सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला आम आदमी पक्षानेही पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीने पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना, तसेच पक्ष कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने पोलिसांना पत्र लिहून प्रशासकीय कारणास्तव १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क पूर्णपणे बंद राहील असे स्पष्ट केले आहे. लुटियन्स भागातील व्हीआयपी निवासस्थाने आणि महत्त्वाच्या सरकारी इमारतींच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय नाकाबंदी करत, सिमेंटचे ब्लॉक आणि काटेरी तारांचे कुंपण उभारण्यात आले आहे. आंदोलकांच्या वाहनांना या परिसरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
नवरात्र आणि दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात सुरक्षेचा भाग म्हणून दिल्ली पोलीस, सीआरपीएफ (CRPF) आणि आरएएफच्या (RAF) जवानांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. दिल्लीच्या सीमांवर वाहनांची कसून तपासणी सुरू असून ड्रोन आणि उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयितांवर नजर ठेवली जात आहे. लागू करण्यात आलेल्या कलम १६३ नुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी आहे. परवानगीशिवाय मोर्चा काढणे किंवा शस्त्रास्त्रे आणि लाठ्या-काठ्या बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजेंद्र शिंदेंची दोन दिवस कसून चौकशी; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे?
- काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना आता पश्चाताप; राहुल गांधींचा मोठा दावा
- पोलिस मला कधीही उचलू शकतात; तिरंगा मोर्चापूर्वी कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंचा मोठा दावा
Quick Answers
हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि सीजेपी नेते आशुतोष रांका व सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुकारण्यात आले आहे.
सीजेपीच्या या आंदोलनाला आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून २७ हजार जवान तैनात करण्यात आले असून संपूर्ण परिसरात कलम १६३ लागू करण्यात आले आहे.
दिल्ली महानगरपालिकेने प्रशासकीय कारणास्तव १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क पूर्णपणे बंद राहील, असे पोलिसांना पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






