प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना आता आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, असा मोठा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या एका अनौपचारिक बैठकीत त्यांनी या नेत्यांबाबत आपले मत मांडले.
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात काँग्रेसने सलग दोन आठवडे जोरदार आंदोलन केले. यानंतर राहुल गांधी यांनी सेवादल, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांसोबत 'चाय पे चर्चा' केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा आणि भाजपविरोधातील लढा सुरूच ठेवण्याचा कानमंत्र दिला.
या चर्चेदरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचा विषय प्रामुख्याने निघाला. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे महत्त्वाची पदे भोगून आता भाजपमध्ये गेल्यावर काँग्रेसवरच टीका करणाऱ्यांवर राहुल गांधींनी निशाणा साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षांतर केलेल्या नेत्यांना आता बदललेली राजकीय स्थिती आणि जनतेच्या मनातील रोष समजू लागल्याने त्यांना आपली चूक लक्षात आली असल्याचे राहुल म्हणाले.
याच मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींना मिश्किल टोला लगावला. भाजपमध्ये गेलेल्यांपैकी काही जण तुमचे 'बेस्ट फ्रेंड' होते, अशी आठवण खरगे यांनी करून दिली. त्यावर हसत हसत उत्तर देताना, "राजकारणात कोणीही मित्र नसतो," अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली. या बैठकीत हलक्याफुलक्या वातावरणात कार्यकर्त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची एकजुटता आणि आगामी रणनीतीवरही या बैठकीत मंथन झाले. भाजपविरोधातील या लढ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसला साथ द्यायला हवी, अशी अपेक्षा राहुल गांधींनी व्यक्त केली. अन्य नेत्यांनी भाजपविरोधात उघड भूमिका घेऊनही, मायावती अद्याप भाजपवर थेट हल्लाबोल करत नसल्याचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आला.
📌 महत्वाच्या बातम्या
- पोलिस मला कधीही उचलू शकतात; तिरंगा मोर्चापूर्वी कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंचा मोठा दावा
- BRIS-W vs ACT-W: ब्रिस्बेन विरुद्ध एसीटी वुमेन्स टी-२० सामन्यासाठी ड्रीम११ प्रेडिक्शन आणि फँटसी टिप्स
- भारत वि. झिम्बाब्वे महिला १ला टी-२० सामना: ड्रीम ११ टीम, पिच रिपोर्ट आणि संभाव्य प्लेईंग ११
Quick Answers
काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना आता आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेसने निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात सलग दोन आठवडे जोरदार आंदोलन केले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपमध्ये गेलेल्यांपैकी काही जण राहुल गांधींचे 'बेस्ट फ्रेंड' असल्याची आठवण करून दिल्यावर, "राजकारणात कोणीही मित्र नसतो," अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी हसत हसत केली.
भाजपविरोधातील लढ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसला साथ द्यायला हवी, अशी अपेक्षा राहुल गांधींनी व्यक्त केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






