अमित शाहांचा २०२९ च्या निवडणुकीबाबत मोठा दावा; राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळले

अमित शाह यांनी राहुल गांधींचे सर्व आरोप निराधार ठरवत, २०२९ मध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येईल आणि काँग्रेसचा सलग चौथा पराभव होईल असा दावा केला.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत, आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत येईल, असा मोठा दावा केला आहे. निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची राहुल गांधींनी केलेली मागणी शाह यांनी फेटाळली असून, काँग्रेसचे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुजरात, राजस्थान आणि त्रिपुरामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला मिळालेला मोठा विजय राहुल गांधींसाठी एक धडा असल्याचे शाह म्हणाले. या निवडणुका ईव्हीएमवर न होता मतपत्रिकेवर झाल्याचे स्पष्ट करत, भाजप केवळ यंत्रांच्या जीवावर जिंकतो हा काँग्रेसचा दावा त्यांनी खोडून काढला. यावेळी काँग्रेसचा 'घटनाबाह्य पक्ष' असा उल्लेख करत त्यांनी जोरदार टीका केली.

राजस्थानमधील निवडणुकांची आकडेवारी देताना शाह यांनी सांगितले की, भाजपने ९० टक्के महानगरपालिका, ६६ टक्के नगरपालिका आणि ६५ टक्के नगरपरिषदांच्या जागा जिंकल्या आहेत. तिथे ८५ टक्क्यांहून अधिक प्रभागांमध्ये आम आदमी पक्षाची अनामत रक्कम जप्त झाली. तसेच, त्रिपुरातील ग्रामपंचायत निवडणुकीत एनडीएने ७७.५ टक्के मतांसह जवळपास ४ हजार जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले.

गुजरातमध्ये भाजपने दोन नगरपालिका आणि गांधीनगर महानगरपालिकेतील एकूण १०४ पैकी ९० जागांवर विजय नोंदवला. स्वतःच्या गांधीनगर मतदारसंघात भाजपने ४४ पैकी ३८ जागा जिंकत मतांच्या टक्केवारीत १० टक्क्यांची वाढ केली. येथे 'आप'ने लढवलेल्या सर्व ३२ जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. शाह यांनी आठवण करून दिली की, गेल्या ३३ वर्षांपासून त्रिपुरामध्ये आणि ५४ वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही. तसेच गुजरातमध्ये १९८५ पासून (गेल्या ४१ वर्षांत) काँग्रेसने एकही निवडणूक जिंकलेली नाही. राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते झाल्यापासून पक्षाचा सातत्याने पराभव होत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

घुसखोरांना संरक्षण देण्याचे काँग्रेसचे राजकारण जनतेने ओळखले असल्याचा इशारा शाह यांनी राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांना दिला. २०२९ मध्ये काँग्रेसला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. खोट्या प्रचाराला न बळी पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या 'कमळ' चिन्हावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी त्रिपुरा, राजस्थान, गुजरात, बंगाल आणि आसामच्या जनतेचे आभार मानले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दाव्यानुसार, आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत येईल आणि काँग्रेसला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागेल.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही