अभिजीत दीपकेंना नवा पर्याय? मक्खी जनता पार्टीचे ७२ तासांत ३.३ लाख फॉलोअर्स; माशांनी उडवली झोप

सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर इन्स्टाग्रामवर ‘मक्खी जनता पार्टी’ची स्थापना झाली असून ७२ तासांत या पेजने ३.३ लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: 'कॉकरोच जनता पार्टी'नंतर आता सोशल मीडियावर 'मक्खी जनता पार्टी'ची (MJP) जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका टिप्पणीनंतर इन्स्टाग्रामवर हा नवा पक्ष उदयास आला असून, अवघ्या ७२ तासांत तब्बल ३.३ लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवत या पेजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नव्या ट्रेंडला जेनझी (GenZ) पिढीकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा पक्ष अभिजीत दीपके यांना पर्याय ठरणार की त्यांना पूरक म्हणून काम करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

१० ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने रस्ते, मेट्रो आणि रेल्वे बंद करत ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. याविरोधातील याचिकेवर ९ ऑक्टोबरला सुनावणी घेताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. नागरिकांची सुरक्षा करणे हे सरकारचे काम असले तरी, लोकांना त्रास होईल असे निर्णय घेऊ नयेत, असे सांगत 'माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका,' अशी सूचक टिप्पणी न्यायालयाने केली होती.

याच टिप्पणीचा धागा पकडत 'मक्खी जनता पार्टी'ची स्थापना झाली. सरन्यायाधीशांच्या विधानाचा संदर्भ देत, 'आता तर माशीही म्हणले, आम्ही कुणापेक्षा कमी नाही,' अशी प्रतिक्रिया एमजेपीने दिली आहे. या पक्षाच्या इन्स्टाग्राम पेजवरील व्हिडिओंना ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२१ मध्ये तयार करण्यात आलेल्या या अकाऊंटचे नाव आता ‘makhijantaparty.ig’ असे ठेवण्यात आले असून, यापूर्वी तब्बल आठ वेळा या पेजचे नाव बदलण्यात आल्याचे समोर आले आहे.

या पक्षाचा संस्थापक म्हणून 'आर्यन' नावाच्या एका विद्यार्थ्याचे नाव पुढे आले आहे. सध्या या संघटनेच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून अधिकृत प्रवक्त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हा आर्यन नेमका कोण आहे, तो कुठल्या राज्याचा आहे आणि त्याची सामाजिक किंवा राजकीय पार्श्वभूमी काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आर्यनच्या या नव्या पक्षामुळे राजकारणात नक्की काय भूमिका घेतली जाणार आणि तो अभिजीत दीपकेंना कशाप्रकारे पूरक किंवा पर्यायी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीदरम्यान 'माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका,' अशी टिप्पणी केली होती. याच टिप्पणीचा धागा पकडत इन्स्टाग्रामवर 'मक्खी जनता पार्टी'ची स्थापना झाली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही