दिल्ली, 14 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेस आणि सीजेपीच्या या आंदोलनातील तीन मुली आणि तीन मुलांनी आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत पोलिसांच्या अत्याचाराचा पाढा वाचला. पोलिसांनी आपल्याला नाझींसारखी वागणूक देत अश्लाघ्य शिवीगाळ केली, तसेच गुप्तजागांवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप या विद्यार्थ्यांनी माध्यमांसमोर केला आहे.
या घटनेनंतर राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. सरकारला कडक इशारा देताना गांधी म्हणाले की, हा हिंदुस्थान असून इथे कोणीही हिंदू, मुस्लीम किंवा शिख नाही. इथे कोणी कोणत्याही जातीचे, तसेच पुरुष किंवा स्त्री नाही. हा केवळ एक आवाज आणि एक आंदोलन आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या आवाजासमोर उभे आहेत. त्यांनी या आवाजासमोर उभे राहू नये, कारण या आवाजाला कोणीच दाबून ठेवू शकत नाही, असा बेधडक सल्ला त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांवर हात उगारणाऱ्या पोलिसांनाही राहुल गांधी यांनी खणखणीत इशारा दिला. विद्यार्थ्यांना या अमानुष मारहाणीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पुरावे जवळ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसकडेही याचे पुरावे असल्याचे सांगत, हे प्रकरण संपल्यावर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. ज्ञानेश कुमारांपासून ते पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि विद्यार्थ्यांवर हात उचलणाऱ्या पोलीस शिपायांपर्यंत सर्वांना शिक्षा होईल, असे स्पष्ट करत 'घाबरू नका, लव्ह यू, थँक यू', असे म्हणत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील १०० नगरसेवकांना भाजपची ‘कारणे दाखवा’ नोटीस; कार्यक्रमाला दांडी मारणे भोवले
- पुणे शिक्षक मतदारसंघ: महायुतीत होणार मैत्रीपूर्ण लढत, शिंदे गट सचिन सानपांच्या तर भाजप गावंडेंच्या पाठीशी
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत; राज्यात आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
Quick Answers
दिल्लीतील आंदोलन हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू होते.
पोलिसांनी आपल्याला नाझींसारखी वागणूक देत अश्लाघ्य शिवीगाळ केली आणि गुप्तजागांवर मारहाण केली, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
काँग्रेस आणि सीजेपीच्या या आंदोलनातील तीन मुली आणि तीन मुलांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना मारहाणीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पुरावे जवळ ठेवण्याचे आवाहन केले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






