अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच CJP ला धक्का; दोन नेत्यांची थेट ५ दिवसांसाठी तुरुंगात रवानगी

अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच सीजेपीच्या आशुतोष रांका आणि सौरव दास या दोन नेत्यांना ५ दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Published On: 

MHD LOGO

दिल्ली, 14 ऑक्टोबर: सीजेपीला (CJP) मोठा धक्का बसला असून, अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे. काल जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना रात्री उशिरा अटक केली.

आज सकाळी या तिघांनाही दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. जंतरमंतरच्या प्रतिबंधित भागात बेकायदेशीर प्रवेश करणे आणि दंडाधिकाऱ्यांनी घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना आता ५ दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीत दाखल होताच त्यांना अटक करून अटींसह जामीन देण्यात आला होता; मात्र त्यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, रत्ना सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात या तिघांवर अनधिकृत प्रवेश, बंधपत्रातील अटी मोडणे आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडीअंतर्गत तिहार तुरुंगात पाठवले जाण्याची शक्यता आहे.

हे दोन महत्त्वाचे नेते तुरुंगात गेल्याच्या पार्श्वभूमीवर, अभिजीत दिपके नागपूरहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. दुपारी एक वाजेच्या सुमारास ते दिल्ली विमानतळावर पोहोचतील. दिल्लीत दाखल होण्यापूर्वी त्यांनी आशुतोष आणि सौरभ यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, आता या प्रकरणात दिपके नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना रात्री उशिरा अटक केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही