दिल्ली, 14 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) तीन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे अशी या नेत्यांची नावे आहेत. या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत (जेसी) तिहार जेलमध्ये पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कारवाईबाबत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी वकील रत्ना सिंग यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. पहाटे ३ वाजता त्यांना एका खाजगी व्हॅनमधून संसद मार्ग (पार्लमेंट स्ट्रीट) पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना एका तासाच्या आत एसईएम (SEM) कोर्टासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती सकाळी देण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही नेत्यांवर बेकायदेशीरपणे जंतरमंतरवर प्रवेश करणे, बॉण्डच्या अटींचे उल्लंघन करणे आणि सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वकील रत्ना सिंग यांनी म्हटले आहे की, या बेकायदेशीर कृतींनंतरही नेत्यांचे मनोधैर्य खचलेले नाही. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे त्यांच्या आजीचे निधन झाल्याने सध्या हिंगोलीत आहेत. त्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपले मनोधैर्य कोणीही खचवू शकत नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
सीजेपीच्या या आंदोलनामुळे दिल्ली पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत. पोलिसांनी जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगी नाकारली असून, पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत इंडिया आघाडीचे मोर्चेही निघताना दिसत आहेत. याआधीही जंतरमंतरच्या आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी विमानातून ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर काही अटींवर कोर्टाने त्यांना जामीन दिला होता.
सीजेपी सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच या पक्षाने नीट (NEET) पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन उभे करत तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सीजेपीने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतरच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचे समोर आले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘माझी केवळ इतकीच इच्छा आहे की…’ CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांची INDIA आघाडीला एकजुटीची हाक
- नाशिकमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र; पाणीटंचाईच्या मुकाबल्यासाठी प्रशासनाचा विस्तृत आराखडा
- अमित शाहांचा २०२९ च्या निवडणुकीबाबत मोठा दावा; राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळले
Quick Answers
दिल्ली पोलिसांनी सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे या सीजेपीच्या तीन नेत्यांना अटक केली आहे.
सीजेपी नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.
या नेत्यांवर बेकायदेशीरपणे जंतरमंतरवर प्रवेश करणे, बॉण्डच्या अटींचे उल्लंघन करणे आणि सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे त्यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे सध्या हिंगोलीत आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







