नाशिक, 14 ऑक्टोबर: नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून, नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर बैठका घेण्यात आल्या असून, संभाव्य परिस्थितीचा प्राथमिक अहवालही मांडण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेने एक विस्तृत आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत शेकडो टँकरच्या माध्यमातून तब्बल ७०० ते ८०० गावे आणि खेड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी आवश्यक ते जलस्रोत आरक्षित केले जाणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, मालेगाव, मनमाड, नांदगाव, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती सर्वाधिक भीषण असू शकते. त्यामुळे या परिसरातील गाव-खेड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून तिथे सर्वाधिक पाणीपुरवठा केला जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमित शाहांचा २०२९ च्या निवडणुकीबाबत मोठा दावा; राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळले
- अभिजीत दीपकेंना नवा पर्याय? मक्खी जनता पार्टीचे ७२ तासांत ३.३ लाख फॉलोअर्स; माशांनी उडवली झोप
- महायुतीत नेमकं काय घडतंय? सलग दोन बैठकांना दांडी मारल्याने एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा
Quick Answers
जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर बैठका घेण्यात आल्या असून संभाव्य परिस्थितीचा प्राथमिक अहवाल मांडण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषदेने ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांसाठी एक विस्तृत आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यांतर्गत शेकडो टँकरच्या माध्यमातून सुमारे ७०० ते ८०० गावे आणि खेड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तसेच आवश्यक ते जलस्रोत आरक्षित केले जाणार आहेत.
प्राथमिक अहवालानुसार मालेगाव, मनमाड, नांदगाव, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती सर्वाधिक भीषण असू शकते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






