धाराशिव, 15 ऑक्टोबर: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी आहे. ही मदत वाढवून मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळावे यासाठी पक्ष आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. ते धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सध्या राज्याचे अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. यावर बोलताना तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर अप्रत्यक्ष टीका केली. अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी अतिशय शिस्तीने अर्थखाते सांभाळले होते आणि आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली होती, असे तटकरे म्हणाले. दिवाळीपूर्वी जाहीर झालेल्या या पाच हजार रुपयांच्या मदतीवर शेतकऱ्यांसह विरोधकांकडूनही सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
यापूर्वी, दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये तातडीची मदत देण्याची घोषणा केली होती. गेल्या २५ वर्षांत राज्यात नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर करून डिसेंबरमध्ये मदत दिली जात असे, मात्र यावेळी शासनाने लवकर दुष्काळ जाहीर करत ऑक्टोबरमध्येच जीआर काढल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, आज सप्लीमेंटरी जीआर काढून १२ योजना लागू केल्या असून, शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीची असल्याने हा मोठा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयपीएल २०२७: मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करावे, आर. अश्विनचा मोठा सल्ला
- महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची? सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावली नोटीस
- कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्यावरून अश्विनची गौतम गंभीरवर जोरदार टीका
Quick Answers
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. ही मदत वाढवून मिळण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळावे यासाठी पक्ष आग्रही असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
दिवाळी गोड करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये तातडीची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
गेल्या २५ वर्षांत राज्यात नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर करून डिसेंबरमध्ये मदत दिली जात असे, मात्र यावेळी शासनाने लवकर दुष्काळ जाहीर करून ऑक्टोबरमध्येच जीआर काढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







