सुनेत्रा पवारांच्या भाषणावेळी फडणवीस-जयंत पाटलांची चर्चा; शरद पवारांसमोरच रंगल्या गप्पा

तळेगाव एमआयडीसीतील कार्यक्रमात सुनेत्रा पवारांच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात रंगलेली कुजबुज कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Published On: 

MHD LOGO

पुणे, 14 ऑक्टोबर: पुण्यातील तळेगाव एमआयडीसी येथे ईआयएमच्या (EIM) इलेक्ट्रिक हेवी-ड्युटी कमर्शियल व्हेईकल कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनप्रसंगी एक वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळाले. मंचावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भाषण सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात कुजबुज करत चर्चा केली. विशेष म्हणजे यावेळी शेजारीच शरद पवार उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुनेत्रा पवार भाषणासाठी उभ्या राहिल्यावर त्यांची खुर्ची रिकामी झाली. याच संधीचा फायदा घेत जयंत पाटील शरद पवारांच्या मागून आले आणि त्यांनी फडणवीसांच्या शेजारील सुनेत्रा पवारांची खुर्ची धरून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. हे सर्व शरद पवारांच्या डोळ्यांदेखत घडले आणि कॅमेऱ्यातही टिपले गेले.

जयंत पाटील यांच्यासोबतची कुजबुज संपताच मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट शरद पवार यांच्याशीही मनमोकळ्या गप्पा मारल्या. राजकीय वर्तुळात जयंत पाटील भाजपसोबत जाणार किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सामील होणार आणि पाटलांना अर्थमंत्रीपद मिळणार, अशा चर्चा नेहमीच सुरू असतात. त्यामुळे दोन-एक मिनिटांच्या या संवादाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, ही केवळ शिष्टाचार भेट होती की काही नवी राजकीय खेळी शिजतेय, याबाबत राज्यात नव्या राजकीय चर्चेने जोर धरला आहे.

याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना उद्देशून विरोधकांवर उपरोधिक टीका केली. सामंजस्य करार (MOU) केल्यानंतर पुढे त्याचे काय होते, असा प्रश्न विरोधक अनेकदा विचारतात. त्याचे पुढे 'एनर्जी एन मोशन' होते, याचा आपल्याला मनापासून आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, इंधनावर चालणाऱ्या केवळ ३ टक्के गाड्यांमुळे ३५ टक्के प्रदूषण होते आणि २५ टक्क्यांपर्यंत वाहतूक कोंडी होते. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि इंधनावर खर्च होणारे परकीय चलन वाचेल. इलेक्ट्रिक ट्रकमुळे चालकाला आराम मिळेल आणि अपघातमुक्त, अधिक सुरक्षित वाहतूक पाहायला मिळेल. आपण ५० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा टप्पा गाठल्यास आपले ५० टक्के इंधन वाचेल आणि डॉलरचा भाव २० रुपयांनी कमी करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी येथे ईआयएमच्या (EIM) इलेक्ट्रिक हेवी-ड्युटी कमर्शियल व्हेईकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन पार पडले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही