थेट निलंबित करणार! आचारसंहितेचे कारण सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस संतापले

मंत्रिमंडळ बैठकीत आचारसंहितेचे कारण सांगून गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस भडकले. अशा अधिकाऱ्यांची नावे सांगा, त्यांना थेट निलंबित करू, असा इशारा त्यांनी दिला.

Published On: 

Devendra Fadnavis BJP meeting

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ निवारणावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत जे अधिकारी दुष्काळाच्या बैठकीला गैरहजर राहतील, त्यांना थेट निलंबित करण्याचा कडक इशारा फडणवीस यांनी दिला. अशा दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांची फक्त नावे सांगा, असे त्यांनी बैठकीत उपस्थित मंत्र्यांना स्पष्ट केले.

सध्या राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक आयोग परवानगी देत नाही, अशी कारणे देत काही अधिकारी दुष्काळाच्या बैठकीला येणे टाळत असल्याच्या तक्रारी मंत्र्यांनी या बैठकीत केल्या होत्या. यावर संताप व्यक्त करत फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. दुष्काळ निवारणाच्या कामाकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि परवानगी घेण्याच्या भानगडीत न पडता तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ निवारणाबाबत राज्य सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, आता एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच आणखी ४० तालुके दुष्काळग्रस्त असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम रक्कम म्हणून ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

दिवाळीच्या आधी ज्या शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्या सर्वांना ही मदत दिली जाणार आहे. तसेच १०० टक्के पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील साधारण सव्वा कोटी शेतकऱ्यांना होणार असून, यासाठी राज्य सरकारकडून सुमारे ६ हजार कोटी रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत जे अधिकारी दुष्काळाच्या बैठकीला गैरहजर राहतील, त्यांना थेट निलंबित करण्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही