प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: देशासह महाराष्ट्रावर यंदा 'एल निनो'चे मोठे संकट घोंघावत आहे. राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असतानाच, आता हवामानाबाबत आणखी एक मोठा आणि चिंताजनक इशारा देण्यात आला आहे.
यंदा एल निनोमुळे देशातील अनेक भागांत पावसाने पाठ फिरवली. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यासारख्या भागात सरासरीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्याच्या इतर भागांतही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम आधीच गेला आहे. मात्र, आता येणाऱ्या रब्बी हंगामावरही मोठे संकट उभे राहिले आहे.
हवामान विभाग आणि तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात एल निनो अधिक तीव्र होत जाणार आहे. पुढील काही महिन्यांत याचे रूपांतर 'सुपर एल निनो'मध्ये होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या एल निनोचा प्रभाव भारतात पुढील वर्षी फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
लवकरच देशात हिवाळ्याला सुरुवात होईल, मात्र एल निनोच्या प्रभावामुळे यंदा थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. हिवाळ्यातही वातावरण गरम राहण्याची आणि तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच, देशात बर्फवृष्टी होण्याची शक्यताही कमीच आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी कडाक्याच्या थंडीची आणि गारठ्याची आवश्यकता असते. मात्र, आता वाढत्या तापमानामुळे ही पिकेही मोठ्या संकटात सापडली आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- आंदोलनाची दिशा बदलली; राजू शेट्टी यांची उद्यापासून राज्यातील साखर कारखाने बंद पाडण्याची घोषणा
- अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा १ रुपया जास्त मानधन घेणार; कमलेश सावंत यांनी सांगितला नाना पाटेकरांचा ‘तो’ किस्सा
- अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; CJP नेत्यांच्या अटकेनंतर दिल्लीत निघणार ‘लेहरा दो तिरंगा मार्च’
Quick Answers
महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यासारख्या भागात सरासरीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आधीच खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला असून रब्बी हंगामावरही संकट उभे राहिले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात एल निनो अधिक तीव्र होत जाणार असून, पुढील काही महिन्यांत याचे रूपांतर 'सुपर एल निनो'मध्ये होण्याची शक्यता हवामान विभाग आणि तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार, या एल निनोचा प्रभाव भारतात पुढील वर्षी फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहू शकतो.
यंदा थंडीचे प्रमाण कमी राहणार असून हिवाळ्यातही वातावरण गरम राहण्याची आणि तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच बर्फवृष्टी होण्याची शक्यताही कमीच वर्तवण्यात आली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








