आंदोलनाची दिशा बदलली; राजू शेट्टी यांची उद्यापासून राज्यातील साखर कारखाने बंद पाडण्याची घोषणा

ऊसतोड मजूर आणि कामगारांच्या आंदोलनाचे स्वरूप बदलले असून, शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उद्यापासूनच राज्यातील सर्व साखर कारखाने बंद पाडण्याची घोषणा केली आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: ऊसतोड मजूर आणि साखर कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उद्यापासून राज्यातील सर्व साखर कारखाने बंद पाडण्याची मोठी घोषणा केली आहे. याआधी २२ ऑक्टोबर रोजी आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता हा निर्णय बदलून उद्यापासूनच आक्रमक पावले उचलली जाणार आहेत.

उद्यापासून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक अडवले जातील, तसेच कारखान्यातून साखर बाहेर जाऊ देणार नाही, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. "त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत," अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. यापुढील रणनीती आखताना सध्यातरी सुरू असलेले रस्ता रोको आणि महामार्गावरील आंदोलने थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

उद्या सकाळी १० वाजता सांगलीच्या कडेगाव येथील रेठरेमधील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर धडक देऊन तो बंद पाडण्यात येणार आहे. याबाबत अभिजीत दिपके यांनीही कृष्णा कारखाना बंद पाडण्याची घोषणा केली असून, उद्या एकूण तीन कारखाने बंद पाडणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जोपर्यंत सर्व मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत, तोपर्यंत २२ ऑक्टोबरपासून राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा कडक इशारा तात्यासाहेब काळे यांनी दिला आहे. एकीकडे ऊसदरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असतानाच, आता कामगारांच्या या संपामुळे राज्यातील साखर उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू होणार की नाही, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उद्यापासून राज्यातील सर्व साखर कारखाने बंद पाडण्याची मोठी घोषणा केली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही