जालना, 16 ऑक्टोबर: राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेले अंतरवाली सराटी हे गाव दत्तक घेणार आहेत. टंचाईग्रस्त गावांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या 'गाव दत्तक अभियाना'अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.
राज्यात १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढते तापमान, आटलेले जलाशय आणि करपलेल्या पिकांमुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांसाठी मदतीची तिसरी फेरी घोषित केली आहे. तसेच दुष्काळाची झळ बसलेल्या गावांच्या यादीतही राज्य सरकारने वाढ केली असून, याच पार्श्वभूमीवर जालन्यातील गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने हे अभियान हाती घेतले आहे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून लोकसहभागावर आधारित हे अभिनव अभियान राबवले जात आहे. या सामाजिक दायित्वाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांचे कार्यक्षेत्र असलेले अंतरवाली सराटी गाव दत्तक घेण्याचे जाहीर केले आहे. लवकरच त्या या गावाला भेट देणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अतिसंवेदनशील आणि दुष्काळी गावांमधील नागरिकांना वेळेवर मदत मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी मदत करू इच्छिणारे नागरिक, उद्योजक, स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांना थेट गरजूंशी जोडण्यासाठी एका त्रिस्तरीय सूत्राचा अवलंब या अभियानात करण्यात येणार असल्याचे आशिमा मित्तल यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- अन्याय होऊ देणार नाही, मी पाठीशी उभा आहे; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा राम पूर्णेकरांना शब्द
- पेणवर शिवसेनेचा दावा; ‘पुढचा आमदार आपलाच’, नवनिर्वाचित तालुकाप्रमुख संजय म्हात्रेंचे भाजपला आव्हान
- नागपुरात विद्यार्थिनींना धार्मिक संदेश पाठवणाऱ्या प्राध्यापकावर कारवाईची मागणी; विहिंपची पोलिसांत धाव
Quick Answers
राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेले अंतरवाली सराटी हे गाव दत्तक घेणार आहेत.
टंचाईग्रस्त गावांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे 'गाव दत्तक अभियान' सुरू केले आहे.
हे अभियान जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून लोकसहभागावर आधारित राबवले जात आहे.
अतिसंवेदनशील आणि दुष्काळी गावांमधील नागरिकांना वेळेवर मदत मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








