🕒 1 min read
दहिसर– निवडणुकीत मतं मागायला येताना हात जोडले जातात, पण इथे तर चक्क हात उचलले गेलेत! निवडणुकीच्या धामधुमीत दहिसरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरात घुसून प्रचार करण्यास विरोध केला म्हणून शिवसेना (Eknath Shinde गट) कार्यकर्त्यांनी दोन नागरिकांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, मतदारांना मारण्यासाठी कार्यकर्त्यांनी हातातल्या पक्षाच्या झेंड्यांचाच वापर केला. या गुंडगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा पसरला असून मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
सोमवारी (५ जानेवारी) संध्याकाळी दहिसर पश्चिममधील प्रभाग क्रमांक १ मध्ये Eknath Shinde गटाच्या उमेदवार रेखा राम यादव यांची प्रचार फेरी सुरू होती. विठ्ठलवाडी सोसायटीजवळ ही फेरी आली असता, काही अतिउत्साही कार्यकर्ते एका घरात प्रचार करण्यासाठी शिरले. जेव्हा संबंधित घरातील व्यक्तींनी “घरात प्रचार नको” अशी भूमिका घेतली, तेव्हा कार्यकर्त्यांचा संयम सुटला. ८ ते १० कार्यकर्त्यांच्या टोळक्याने त्या दोघांना अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी तुडवून काढले.
स्वतःला जनसेवक म्हणवून घेणारे हे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यांनी कायद्याचीही भीती बाळगली नाही. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरण पोलिसांत गेल्यावर एम.एच.बी (MHB) पोलिसांनी तातडीने हालचाली करत मध्यरात्रीच ८ ते १० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
“निवडून येण्याआधीच जर ही दादागिरी असेल, तर उद्या सत्ता आल्यावर हे काय करतील?” असा संतप्त सवाल आता दहिसरकर विचारत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मारहाणीमुळे शिंदे गटाची चांगलीच नाचक्की होण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “विलासरावांचे नाव पुसणार?”; रितेश देशमुखांचे भाजप नेत्याला ‘खणखणीत’
- राज ठाकरेंना धक्का; ‘दादर’चा वाघ भाजपच्या गळाला! नितेश राणेंनी ‘असा’ फिरवला गेम
- चंद्रकांत पाटलांचा अजितदादांवर ‘पलटवार’; भर सभेत थेट जुनी ‘कुंडली’च काढली!
- देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना इशारा: “आरसा बघायची गरज कोणाला? जास्त मागे जाल तर वाद वाढेल!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










