Share

कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाने दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर; परवानगीविना जंतर मंतरवर काय घडणार?

नीट परीक्षेतील गोंधळाच्या निषेधार्थ कॉकरोच पार्टीने जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे.

Published On: 

Abhijit Dipke CJP Protest Abhijit Dipke arrives in Delhi for Jantar Mantar protest

🕒 1 min read

दिल्ली – नीट (NEET) परीक्षेच्या गोंधळानंतर विद्यार्थ्यांचा संताप आता थेट राजधानीच्या रस्त्यांवर उतरणार का? शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ६ जूनला दिल्लीत धडकणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाने सध्या प्रशासनाची झोप उडवली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर मंतरवर होणाऱ्या या आंदोलनासाठी सीजेपीने अद्याप पोलिसांची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही. मात्र, तरुणाईमधील वाढता रोष पाहता दिल्ली पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, परवानगीशिवाय आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यास थेट ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

कॉकरोच पार्टीचे आंदोलन: हजार जवान तैनात, विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला धार

उद्या सकाळपासूनच दिल्लीत सुमारे एक हजार पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात असतील. याआधी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी १ जूनला एक व्हिडिओ जारी करत समर्थकांना थेट विमानतळावरच जमण्याचे आवाहन केले होते. तिथून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊन आपण आंदोलनाची परवानगी मागू, असे ते म्हणाले होते.

मात्र, ४ जूनला त्यांनी आपली भूमिका बदलली. विमानतळावर गर्दी केल्यास प्रवाशांची आणि सुरक्षा यंत्रणांची मोठी गैरसोय होईल. त्यामुळे समर्थकांनी विमानतळावर न येता थेट जंतर मंतरकडेच यावे, असे आवाहन दीपके यांनी ‘एक्स’वरून (X) केले.

दुसरीकडे, नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे पाच विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचा अत्यंत गंभीर मुद्दा दीपके यांनी मांडला आहे. सीबीएसई (CBSE), सीयूईटी (CUET) आणि एसएससी (SSC) परीक्षांमधील भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. देशभरात एवढी संतापाची लाट उसळली असतानाही शिक्षणमंत्री राजीनामा का देत नाहीत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळेच, सीजेपीचे (Cockroach Party) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी स्पष्ट केले की, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू केलेल्या ऑनलाइन याचिकेला आतापर्यंत आठ लाखांहून अधिक जणांनी पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांचा हा असंतोष पाहता, आता या आंदोलनाला दिल्लीत किती प्रतिसाद मिळतो आणि पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही