गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांनी दोन चॉकलेट देत दिला मोलाचा सल्ला

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आमदार गोपीचंद पडळकरांना चॉकलेट देत ‘बोल कमी, काम जास्त’ करण्याचा सल्ला दिला.

Published On: 

MHD LOGO

सांगली, 17 ऑक्टोबर: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. या निर्णयानंतर सांगलीचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांना दोन चॉकलेट (कॅडबरी) देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पाटील यांनी मिश्किल टिप्पणी करताना म्हटले की, पडळकरांच्या स्थितीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात. तसेच, आता बोलायचे कमी आणि काम जास्त करून दाखवायचे, असा सल्लाही त्यांनी दिला.

यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जत सोसायटी गटातील पडळकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय कायम ठेवला होता. यामुळे ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून बाहेर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, या निर्णयाचा आदर राखत आपल्या कायदेशीर टीमने तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिल्याने ते पुन्हा एकदा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पडळकर पुन्हा निवडणुकीत आल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा सत्कार करताना त्यांची तुलना कसलेल्या पैलवानाशी केली. 'जसा एखादा कसलेला पैलवान आठ-दहा जणांना लोळवतो, तसे ते आहेत. ते बँकेत आल्यावर काय होईल आणि कसे होईल, याची सगळी व्यूहरचना झाली आहे,' असे पाटील म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनीही पडळकरांना 'तू बोल कमी आणि काम जास्त कर' असे सांगितल्याचे नमूद करत, अंगात उत्साह हवा पण उन्माद नको, अशा शब्दांत त्यांनी कानपिचक्या दिल्या.

दरम्यान, पडळकरांच्या उमेदवारी अर्जावर याचिकाकर्त्यांनी काही गंभीर आक्षेप घेतले होते. जिल्हा बँकेच्या उपविधीनुसार संबंधित संस्थेत किमान दोन वर्षांचे सभासदत्व आणि व्यवस्थापन समितीत एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक असते. पडळकर यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केली, मग त्यापूर्वीच त्यांना कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीचे सभासदत्व कसे मिळाले, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यासोबतच, निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे कार्यक्षेत्र केवळ गावापुरते मर्यादित असल्याने तेथील संचालकपद आणि सभासदत्व निवडणुकीच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरता येईल का, हा मुद्दाही याचिकेत मांडण्यात आला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही