लोहगड केतन अग्रवाल हत्याप्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली असून कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.

Published On: 

MHD LOGO

पुणे, 17 ऑक्टोबर: पुण्यातील लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आता विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केतनच्या वडिलांनी ही माहिती दिली असून, या निर्णयाबद्दल अग्रवाल कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. निकम यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती झाल्याने खटल्याची बाजू प्रभावीपणे मांडली जाईल आणि मुलाला न्याय मिळेल, अशी आशा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेचा उलगडा झाल्यानंतर तो खून असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांना अटक केली आहे. तपासाअंती न्यायालयात तब्बल ५,०५३ पानांचे आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात गुन्ह्याआधी आणि नंतर आरोपींनी केलेल्या डिजिटल सर्चच्या सविस्तर माहितीसह तपासातील सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

या हत्येचा कट कसा शिजला याचा घटनाक्रमही समोर आला आहे. २५ मे रोजी सिया आणि चेतन यांनी केतनला संपवण्याचा (एलिमिनेट) कट रचला. त्यानंतर ३१ मे रोजी सियाने केतनसोबत पहिल्यांदा लोहगडावर जाऊन रेकी केली आणि हत्येसाठी योग्य जागा निश्चित केली.

दरम्यान, ६ जून रोजी केतन आणि सिया बालीला जाणार होते. मात्र, तिथे एकत्र राहावे लागेल या विचाराने ४ जूनलाच हत्येचा बेत आखण्यात आला होता. घरच्यांनी ऐनवेळी विरोध केल्याने तो प्लॅन बारगळला. त्यानंतर मुंबई विमानतळावर जाताना फूड मॉलवर गाडी थांबली असता, सियाने केतनचा पासपोर्ट चोरून कचराकुंडीत फेकून दिला, ज्यामुळे हा बाली दौरा रद्द झाला.

पुढे १९ जून रोजी सियाच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरला रिसॉर्ट बुक करण्यात आले होते. त्याआधी १४ जूनला पुन्हा एकदा लोहगडावरच केतनची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यावेळी हा प्लॅन अमलात येऊ शकला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही