प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आता आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागत आहे. पूर्णेकर यांची पुतणी खुशबू हिला इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकी आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांत्वनासाठी भेट घेतली असता, त्यांच्यासमोरच खुशबूने हा दावा केला.
‘प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तू’, असा मेसेज इन्स्टाग्रामवर आल्याची माहिती खुशबू पूर्णेकर हिने सरनाईक यांना दिली. "आता तुझा नंबर आहे, नेक्स्ट टार्गेट तू," अशा स्वरुपाचे धमकीचे संदेश आपल्याला मिळाल्याचे तिने स्पष्ट केले. या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांनी या हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच, या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींनाही तातडीने अटक करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर विविध पक्षांच्या नेत्यांकडून सांत्वनासाठी भेटी दिल्या जात आहेत. मात्र, आता पुतणीलाही अशा प्रकारे टार्गेट करण्याच्या धमक्या येत असल्याने आपण भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे पूर्णेकर कुटुंबीयांनी सांगितले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रियान परागची २०२७ च्या विश्वचषकासाठी तयारी; शस्त्रक्रियेनंतर बंगळुरूच्या ‘CoE’ मध्ये सराव सुरू
- रावळपिंडीत रंगणार पाकिस्तान-श्रीलंका पहिली वनडे; जाणून घ्या खेळपट्टी, हवामान आणि प्लेइंग 11
- संजय गोविल यांची मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेन्सवर नजर; पण बोलीच्या युद्धात उतरण्यास नकार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






