प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राम पूर्णेकरांची देवेंद्र फडणवीसांशी ठाण्यात भेट, मुख्यमंत्र्यांचा न्यायाचा शब्द

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाण्यात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना न्यायाचे आश्वासन दिले आहे.

Published On: 

MHD LOGO

ठाणे, 17 ऑक्टोबर: शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. या भेटीदरम्यान, 'काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही,' असा शब्द मुख्यमंत्र्यांनी राम पूर्णेकर यांना दिला.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे ठाण्यातील बाळकूम येथील हायलँड पार्क परिसरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी काल ही भेट झाली. या चर्चेनंतर फडणवीस यांनी राम पूर्णेकर यांना दोन दिवसांनी पुन्हा भेटीसाठी बोलावले आहे. या प्रकरणातील पुरवणी एफआयआरमध्ये माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे असून आतापर्यंत पाच मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे, या हत्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. ठाणे गुन्हे शाखेकडून १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी राजेंद्र शिंदे यांची सखोल चौकशी करण्यात आली. पहिल्या दिवशी नऊ तास आणि दुसऱ्या दिवशी आठ तास अशी त्यांची कसून चौकशी झाली.

एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेल्या चौकशीबाबत पूर्णेकर यांचे वकील ॲड. समीर हटणे यांनी महत्त्वाची शक्यता वर्तवली आहे. 'पोलीस विनाकारण इतका वेळ कोणाचीही चौकशी करत नाहीत. त्यांना काहीतरी ठोस आणि महत्त्वाची माहिती मिळाली असावी. चौकशी इतका काळ सुरू आहे, याचा अर्थ प्रत्येक तासाला पोलिसांना महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळत आहेत,' असे हटणे म्हणाले.

२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून प्रदीप पूर्णेकर यांच्यावर पिस्तुलमधून सात गोळ्या झाडल्या होत्या. यापैकी चार गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूर्णेकर यांना कार्यकर्त्यांनी जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येचा कट मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीने रचल्याचा आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

देवेंद्र फडणवीस यांनी राम पूर्णेकर यांना 'काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही,' असा शब्द दिला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही