गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ठरला वैध

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे.

Published On: 

Gopichand Padalkar warns Jitendra Awhad after Vidhan Bhavan scuffle.

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवलेला पडळकरांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आता वैध ठरवला असून, यामुळे त्यांना ही निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार पडळकर यांनी या निवडणुकीसाठी जत सोसायटी गटातून आपला अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जासोबत जोडण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचा आक्षेप माजी आमदार विक्रम सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी घेतला होता. तसेच, पडळकर हे कोणत्याही संस्थेचे संचालक नसून ते दोन वर्षांपूर्वीचे सभासदही नसल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता.

विरोधकांच्या या आक्षेपानंतरही बँकेच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडळकरांचा अर्ज सुरुवातीला वैध ठरवला होता. या निर्णयाविरोधात सावंत आणि शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आव्हान दिले होते. सुनावणीदरम्यान सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे खंडपीठाने पडळकरांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला.

कोल्हापूर खंडपीठाच्या या निर्णयानंतर गोपीचंद पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावरील सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज पुन्हा वैध ठरवला आहे. या निकालानंतर पडळकर समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.

पडळकरांचे कार्यकर्ते महादेव पाटील यांनी यावर समाधान व्यक्त केले. विरोधकांनी उच्च न्यायालयातून अर्जावर स्थगिती मिळवली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान देण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागल्याने आमदार गोपीचंद पडळकर निवडणूक लढवू शकतील, अशी प्रतिक्रिया महादेव पाटील यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सर्वोच्च न्यायालयाने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. यामुळे त्यांना ही निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही