प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'एक्स' (X) या समाजमाध्यमावर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सविस्तर पोस्ट करत 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे देशात अराजकता पसरवण्याचे आणि राजकीय व्यवस्था अस्थिर करण्याचे सुनियोजित षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
देशाचे हित, व्यवस्थेतील बदल आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या नावाखाली सुरू झालेल्या आंदोलनाचा खरा चेहरा आता उघड झाला असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. बांगलादेशाकडून प्रेरणा घेत आणि 'सत्तांतरा'ची (Regime Change) उघडपणे भाषा करत हे लोक विदेशी शक्तींच्या मदतीने सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. मात्र, भारतात केवळ लोकशाही प्रक्रियेतूनच सत्ता बदल होऊ शकतो आणि देशातील जनता असे अलोकतांत्रिक विचार कधीही स्वीकारणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
याच पोस्टमधून प्रधान यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले. पराभवाचे शतक पूर्ण केलेले राहुल गांधी सतत जनतेच्या जनादेशाचा अपमान करत असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीत मनासारखे यश न मिळाल्यानेच काँग्रेसकडून लोकशाही संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय स्वार्थासाठी जनतेला त्रास देण्याच्या आणि लोकांच्या अधिकारांना पायदळी तुडवण्याच्या काँग्रेसच्या जुन्याच लोकशाहीविरोधी मानसिकतेचा हा भाग असल्याचे ते म्हणाले.
हातात संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी प्रत्यक्षात संविधानविरोधी असून जनतेने त्यांना वारंवार नाकारले आहे, असे प्रधान म्हणाले. तरीही सत्तेच्या लालसेपोटी ते घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून लोकशाहीच्या मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. 'राहुल गांधी जी, लोकशाहीबद्दलचा तुमचा हा द्वेषपूर्ण दृष्टिकोन अत्यंत लज्जास्पद आहे,' अशा शब्दांत प्रधान यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, राजीनाम्यानंतर प्रधान अचानक सक्रिय झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येसाठी पप्या शिंदेने चप्पलेऐवजी बूट का घातले? पोलीस तपासात मोठं कारण उघड
- उत्तर प्रदेशात भाजपला मोठं खिंडार; माजी खासदाराचा समाजवादी पक्षात प्रवेश, अनेक आमदारही संपर्कात असल्याचा अखिलेश यादवांचा दावा
- शरद पवार गटाला मोठा धक्का! प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात मोहाडीत ३ नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश
Quick Answers
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे देशात अराजकता पसरवण्याचे आणि राजकीय व्यवस्था अस्थिर करण्याचे सुनियोजित षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या मते, पराभवाचे शतक पूर्ण केलेले राहुल गांधी सतत जनतेच्या जनादेशाचा अपमान करत आहेत. तसेच हातात संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी प्रत्यक्षात संविधानविरोधी असून जनतेने त्यांना वारंवार नाकारले आहे, अशी टीका त्यांनी केली.
धर्मेंद्र प्रधान यांनी इशारा दिला की, भारतात केवळ लोकशाही प्रक्रियेतूनच सत्ता बदल होऊ शकतो आणि देशातील जनता अलोकतांत्रिक विचार कधीही स्वीकारणार नाही.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






