शरद पवार गटाला मोठा धक्का! प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात मोहाडीत ३ नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश

भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे आनंद दुबेही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा पराभव स्वीकारावा लागला. याउलट, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने लक्षणीय यश मिळवले आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. या निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी महायुतीची वाट धरली असून, पक्षांतराची ही गळती सुरूच आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गट आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली मोहाडीतील तीन नगरसेवक आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मोहाडी गटात अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रफुल्ल पटेल यांनी, "आता सर्वांनी एकजुटीनं काम करा," असे आवाहन केले.

राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना ठाकरे गटालाही गळती लागली आहे. ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षावर अनेक आरोप करत आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली मोहाडीतील तीन नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही