ठाणे, 16 ऑक्टोबर: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या तपासात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. २९ सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील कार्यालयात पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली होती. या कटातील मुख्य सूत्रधार आणि पूर्णेकरांचा जुना मित्र पप्या शिंदे याने हत्येच्या दिवशी मुद्दाम चप्पलेऐवजी बूट का घातले होते, याचे धक्कादायक कारण आता पोलीस चौकशीत समोर आले आहे. नेहमी चप्पल घालणारा पप्या त्या दिवशी मात्र बूट घालून पूर्णेकरांच्या कार्यालयात आला होता.
हत्येच्या दिवशी पूर्णेकर यांचे कार्यकर्ते नवरात्रौत्सवाची वर्गणी गोळा करण्यासाठी बाहेर गेले होते. मारेकरी याच संधीची वाट पाहत होते. पप्या शिंदे बूट न काढताच कार्यालयात पूर्णेकरांसोबत बसून राहिला. मारेकरी आत शिरल्यावर पूर्णेकरांना दरवाजा बंद करता येऊ नये, यासाठी पप्याने आपला बुटासह पाय दरवाजाच्या मध्ये ठेवून तो उघडा राहील याची काळजी घेतली. त्याने इशारा करताच संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि नितेश पवार ऊर्फ भावड्या यांनी आत घुसून पूर्णेकरांवर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर अमित जयकिशन सिंग ऊर्फ पपलू आणि निखिल यादव या दोघांनी चॉपरने सपासप वार करत पूर्णेकरांची हत्या केली.
हत्येच्या आदल्या दिवशी पप्या शिंदे चप्पल घालूनच कार्यालयात आला होता. त्याने केबिनबाहेर काढलेली चप्पल पूर्णेकरांच्या एका कार्यकर्त्याने लघुशंकेला जाताना घातली होती. या साध्या कारणावरून पप्या त्या कार्यकर्त्यावर चांगलाच भडकला होता. दुसऱ्या दिवशी मात्र हत्येचा कट पूर्णत्वास नेण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक बुटांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. निवडणुकीतील वादानंतर पप्या शिंदेने गणपतीपासून पुन्हा पूर्णेकरांशी बोलण्यास सुरुवात केली होती. या जवळीकीचा फायदा घेत त्याने मारेकऱ्यांना कार्यालयात घुसवले.
गुन्ह्यानंतर संतोष आणि नितेश हे पप्याच्याच दुचाकीवरून पळून गेले. त्यांच्या पळण्याची सोय म्हणून पप्याने काही अंतरावर एका अल्टो गाडीचीही व्यवस्था करून ठेवली होती, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. विशेष म्हणजे, पूर्णेकरांच्या हत्येनंतर पप्यानेच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात रुग्णालयात नेले होते. मात्र, तिथे पोलिसांना त्याच्या हालचालींवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. सध्या गुन्हे शाखा पप्या शिंदेसह पाचही आरोपींची कसून चौकशी करत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात भाजपला मोठं खिंडार; माजी खासदाराचा समाजवादी पक्षात प्रवेश, अनेक आमदारही संपर्कात असल्याचा अखिलेश यादवांचा दावा
- शरद पवार गटाला मोठा धक्का! प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात मोहाडीत ३ नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश
- मोदी, चोर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना आमचा पाठिंबा; महायुती सरकार होळीपर्यंत नष्ट होईल: विजय वडेट्टीवार
Quick Answers
२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली होती.
मारेकरी आत शिरल्यावर पूर्णेकरांना दरवाजा बंद करता येऊ नये, यासाठी पप्या शिंदेने बुटासह आपला पाय दरवाजाच्या मध्ये ठेवून तो उघडा राहील याची काळजी घेण्यासाठी मुद्दाम बूट घातले होते.
संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि नितेश पवार ऊर्फ भावड्या यांनी पूर्णेकरांवर बेछूट गोळीबार केला, तर अमित जयकिशन सिंग ऊर्फ पपलू आणि निखिल यादव यांनी चॉपरने वार केले.
गुन्ह्यानंतर मारेकरी संतोष आणि नितेश हे पप्याच्या दुचाकीवरून पळून गेले, तसेच त्यांच्या पुढील प्रवासासाठी पप्याने काही अंतरावर एका अल्टो गाडीची व्यवस्था करून ठेवली होती.
हत्येनंतर पप्याने स्वतः पूर्णेकरांना रुग्णालयात नेले होते, मात्र तेथे त्याच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







