प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने पाचही मारेकऱ्यांना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली जात आहे. प्रयागराजमधून सर्वांत शेवटी ताब्यात घेण्यात आलेले संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित जयकिशन सिंग ऊर्फ पपलू हे दोन आरोपी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.
हत्येचा कट रचण्यात आणि इतर व्यवस्था करण्यात संतोष कनोजियाचा सहभाग असल्याने त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शस्त्रांबाबत विचारणा केल्यावर हे दोन्ही आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांनी आतापर्यंत हत्येसाठी वापरलेले एक पिस्तूल आणि एक मोबाईल जप्त केला आहे. मात्र, अद्याप दुसरे पिस्तूल आणि तीन धारदार शस्त्रांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
उर्वरित शस्त्रे न सापडल्यास न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू कमकुवत ठरू शकते. त्यामुळे ही शस्त्रे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे या हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर राजेंद्र शिंदे यांची चौकशी झाल्यानंतर आता मीनाक्षी शिंदे यांचीही गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
एसआयटी प्रमुख अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी राजेंद्र शिंदे यांची आतापर्यंत दोन वेळा चौकशी केली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत राजेंद्र शिंदे, मीनाक्षी शिंदे आणि चौकशी सुरू असलेल्या दोन्ही आरोपींना समोरासमोर आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस चौकशीबाबत बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी आपण तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. "एखाद्या व्यक्तीचे नाव गोवण्यात आल्यानंतर तपास करणे हे पोलिसांचे कामकाज आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून कोणताही अडथळा होणार नाही, हे मी पहिल्या दिवशीच सांगितले होते. त्यामुळे माझ्या पतींना दोन दिवस चौकशीला बोलावले, मला बोलावल्यावर मीदेखील जाणार," असे त्या म्हणाल्या. ज्या प्रभागात आपण राहतो, तेथील प्रत्येक व्यक्तीशी आणि विरोधकांशीही आपला संबंध येतो, त्यामुळे विशिष्ट व्यक्ती का भेटते, असा आरोप करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांचे वय केवळ १५ ते १७…’; पंतप्रधान मोदींच्या भाषणामुळे वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रिया व्हायरल
- ‘त्याला ६ षटकार मारू दे’; जेव्हा विराट कोहलीने युझवेंद्र चहलला दिला होता ‘हा’ अजब सल्ला
- युझवेंद्र चहलचा खुलासा: २०२३ च्या वर्ल्डकपमधून रोहित शर्माने का वगळले?
Quick Answers
प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आलेले संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित जयकिशन सिंग ऊर्फ पपलू हे दोन आरोपी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत एक पिस्तूल आणि एक मोबाईल जप्त केला आहे. तर दुसरे पिस्तूल आणि तीन धारदार शस्त्रांचा अद्याप पोलिसांकडून शोध सुरू आहे.
एसआयटी प्रमुख अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी राजेंद्र शिंदे यांची आतापर्यंत दोन वेळा चौकशी केली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







