प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी मारेकऱ्यांना ओळखत असल्याची कबुली नुकतीच पोलिसांना दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी, आरोपी काम मागायला नगरसेविकेकडे जायचे, मग त्यांनी आरोपींना काय काम दिले हे आपण पाहत आहोत, असा थेट आरोप केला.
बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी पोलिसांच्या तपासावर आपले बारीक लक्ष असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “राजेंद्र शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आरोपी काम मागायला नगरसेविकेकडे यायचे. यांनीच मग आरोपींना काम दिले ना आणि ते कोणते काम होते हे समोर आले आहे. ज्या दिवशी पोलिसांची चौकशी पूर्ण होईल आणि मुख्य आरोपीला संरक्षण दिले जाईल, त्या दिवशी आम्ही आमचे हत्यार बाहेर काढू.”
या प्रकरणाच्या तपासासाठी मंगळवारी ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांना बोलावून तब्बल नऊ तास त्यांची कसून चौकशी केली. यावेळी त्यांना आणि अटकेत असलेल्या पाचही मारेकऱ्यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. माझी पत्नी या परिसरातील ज्येष्ठ नगरसेविका असल्याने हे पाचही आरोपी आपल्याकडे काम मागण्यासाठी यायचे आणि त्यामुळे त्यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या, असा जबाब शिंदे यांनी पोलिसांना दिला. आपण त्यांना ओळखत असलो तरी पूर्णेकर यांच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला. नऊ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना सोडले असले तरी, आरोपींशी ओळख असल्याने त्यांना पुन्हा बोलावले जाण्याची शक्यता आहे. तसेच, मिनाक्षी शिंदे यांचीही चौकशी होऊ शकते.
प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगर येथील कार्यालयात हत्या झाली होती. पाच जणांनी कार्यालयात घुसून गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतला. या घटनेनंतर पूर्णेकर यांचा मुलगा राम आणि भाऊ जयनाथ यांनी शिंदे दांपत्यावर कट रचल्याचा आरोप केला होता. गणपती विसर्जनादरम्यान राजेंद्र शिंदे आणि मारेकरी हे निळकंठ इमारतीबाहेर एकत्र दिसले होते आणि याच इमारतीत हत्येचा कट आखण्यात आल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला होता. आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची तातडीची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- IND vs WI 4th T20: वैभवचा आत्मविश्वास खच्ची केला! टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर माजी दिग्गज संतापले
- सीजेपी आंदोलनाचा फटका, पोलिसांची ‘देश सोडा’ नोटीस; आमिर खानचा भाचा इमरान खान पुन्हा चर्चेत
Quick Answers
प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगर येथील कार्यालयात हत्या झाली होती.
पत्नी ज्येष्ठ नगरसेविका असल्याने आरोपी काम मागण्यासाठी यायचे, त्यामुळे त्यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या; ओळख असली तरी पूर्णेकर यांच्या हत्येशी आपला संबंध नाही, असा जबाब राजेंद्र शिंदे यांनी दिला.
राजेंद्र शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आरोपी काम मागायला नगरसेविकेकडे यायचे, मग त्यांनीच आरोपींना काम दिले आणि ते कोणते काम होते हे समोर आले आहे, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.
पूर्णेकर यांचा मुलगा राम आणि भाऊ जयनाथ यांनी शिंदे दांपत्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे, तसेच राजेंद्र शिंदे आणि मारेकरी निळकंठ इमारतीबाहेर एकत्र दिसल्याचा आणि तेथेच कट आखल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








