प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला चौथ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवल्याने भारताचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत संतापले आहेत. त्यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सातत्याने सलामीच्या जोडीत बदल करण्याऐवजी युवा खेळाडूंना पुरेशी संधी देण्याचा सल्ला दिला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सलामीवीर अभिषेक शर्माला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर श्रीकांत यांनी अभिषेकला विश्रांती देऊन संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीला सलामीला पाठवण्याची सूचना केली. एका यूट्यूब व्हिडिओमध्ये बोलताना श्रीकांत म्हणाले की, 'भारतीय संघव्यवस्थापनाने केवळ संजू सॅमसनच्या आत्मविश्वासाला धक्का दिलेला नाही, तर त्यांनी वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वासही तोडला आहे. त्याला वेस्ट इंडिजसारख्या संघाविरोधात तीन सामन्यांत खेळवता आलं असतं.'
वैभवला संधी न दिल्याबद्दल संताप व्यक्त करतानाच श्रीकांत यांनी संजू सॅमसनच्या कामगिरीतील सातत्यावरही बोट ठेवले. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सॅमसनने तीन महत्त्वाच्या खेळी करत भारताच्या विजेतेपदात मोलाचे योगदान दिले होते. पण त्यानंतर त्याच्या खेळात सातत्याचा अभाव दिसून आल्याचे श्रीकांत यांनी निदर्शनास आणून दिले.
सॅमसनच्या फॉर्मबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, 'सॅमसनच्या कामगिरीत नेहमीच चढ-उतार दिसून आले आहेत. त्याच्या सातत्यावर कायम प्रश्नचिन्ह राहिले आहे. तो अचानक विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करतो आणि त्यानंतर अचानक पूर्णपणे अपयशी ठरतो. अभिषेक शर्मासारख्या खेळाडूमध्ये अशा प्रकारचे टोकाचे चढ-उतार सामान्यपणे दिसत नाहीत. आता पुढील सामन्यात सॅमसन पुन्हा धावा करतो का, हे पाहावे लागेल.'
दरम्यान, या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाला २४ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने १०२ धावांची तडाखेबंद खेळी केली. यामुळे वेस्ट इंडिजने २० षटकांत २४७ धावांचा डोंगर उभा केला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने अर्धशतक झळकावले, मात्र इतर फलंदाजांची अपेक्षित साथ न मिळाल्याने भारतीय संघाला १९.३ षटकांत ९ गडी गमावून २२३ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह वेस्ट इंडिजने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सीजेपी आंदोलनाचा फटका, पोलिसांची ‘देश सोडा’ नोटीस; आमिर खानचा भाचा इमरान खान पुन्हा चर्चेत
- बिग बॅश लीग २०२६-२७: ट्रेंट बोल्टची सिडनी थंडर संघात एन्ट्री, डेव्हिड वॉर्नरला मिळणार साथ
- IND vs WI ५ व्या टी-२० पूर्वी अर्शदीप सिंगच्या दुखापतीवर संजू सॅमसनची मोठी अपडेट
Quick Answers
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला बाहेर ठेवल्यामुळे कृष्णमाचारी श्रीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अभिषेक शर्माला विश्रांती देऊन संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांना सलामीला पाठवण्याची सूचना श्रीकांत यांनी केली होती.
चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने १०२ धावांची तडाखेबंद शतकी खेळी केली.
चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा २४ धावांनी पराभव झाला आणि वेस्ट इंडिजने या विजयासह मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






