प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर आता भाजपचे बडे नेते तथा सभापती राम शिंदे आणि निलेश लंके यांच्यात बंद दाराआड चर्चा पार पडली आहे. या महत्त्वाच्या भेटीमुळे बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा सहकारी बँकेची ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी मानली जाते. त्यामुळेच निवडणुकीआधी होणाऱ्या या जुळवाजुळवीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. लंके आणि पवार तसेच लंके आणि शिंदे यांच्या बैठकीत नेमकी काय रणनीती ठरली आणि जिल्हा बँकेबाबत काय निर्णय झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तरीही या चर्चेतून लवकरच अंतिम निर्णय समोर येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
एकीकडे बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असतानाच, दुसरीकडे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पॅनलची बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीत कोणते गट एकत्र येणार आणि कोण स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नेत्यांच्या आगामी बैठका आणि निर्णयांनंतरच बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार, याचे चित्र स्पष्ट होईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- लोहगड केतन अग्रवाल हत्याप्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तू! पुतणी खुशबूला जीवे मारण्याची धमकी, प्रताप सरनाईक समोर असताना कुटुंबीयांचा दावा
- रियान परागची २०२७ च्या विश्वचषकासाठी तयारी; शस्त्रक्रियेनंतर बंगळुरूच्या ‘CoE’ मध्ये सराव सुरू
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







