‘ही लढाई केवळ खुर्चीसाठी नाही’, सांगली जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज सुप्रीम कोर्टात वैध ठरल्यानंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया

सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर यांचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या पैशांवरील मक्तेदारी मोडून काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जत विकास सोसायटी गटातून दाखल केलेला त्यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे वैध ठरवला आहे. या निकालानंतर पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, न्यायदेवतेच्या निर्णयामुळे सत्य आणि न्यायाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सुरुवातीला तांत्रिक कारणांचा गैरफायदा घेत विरोधकांनी आपला अर्ज बाद झाल्याचा जल्लोष केला होता. गोपीचंद पडळकर स्पर्धेतून बाजूला झाल्यास आपला मार्ग मोकळा होईल, अशी त्यांची समजूत होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालामुळे विरोधकांचे सर्व छुपे राजकीय डावपेच आणि त्यांनी केलेला खटाटोप पूर्णपणे धुळीस मिळाल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.

ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी मर्यादित नाही, असे पडळकर म्हणाले. जिल्हा बँकेत सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या पैशांवर चालणारी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आता कायद्याच्या लढाईत निकाल आपल्या बाजूने आला असून, सहकाराच्या मैदानात जनतेच्या साक्षीने पूर्ण ताकदीने भिडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

सहकार क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासूनच वर्षानुवर्षे सत्तेची मक्तेदारी चालवणाऱ्या प्रस्थापित विरोधकांची झोप उडाली होती. मला कोणत्याही मार्गाने रोखण्यासाठी आणि निवडणुकीतून बाजूला करण्यासाठी त्यांनी पडद्यामागून अनेक प्रयत्न केले. विधान परिषद, विधानसभा आणि आता सहकाराच्या मैदानात उतरताना माझ्या वाटचालीत नेहमीच कायदेशीर अडचणी निर्माण करून मला थांबवण्याचे प्रयत्न झाले.

मात्र, 'देवभूमी जत'च्या जनतेची ताकद आणि भक्कम पाठिंबा सदैव आपल्या पाठीशी राहिल्यामुळे विरोधकांचे हे मनसुबे कधीही यशस्वी झाले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही