Share

रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागनीने डागलं पाहिजे; MPSC आंदोलनावरून गोपीचंद पडळकर संतापले

एमपीएससी आंदोलनावरून गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांचे डोके मेंढराच्या डागनीने डागले पाहिजे, अशी खरमरीत टीका केली आहे.

Published On: 

Gopichand Padalkar criticizes Rohit Pawar over MPSC student protest

सांगली, 10 ऑक्टोबर: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तमाशा केला असून, त्यांचे डोके मेंढराच्या डागनीने डागले पाहिजे, अशा शब्दांत पडळकर यांनी संताप व्यक्त केला.

पुण्यात रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन उभारले आहे. यावरून पडळकरांनी पवारांवर निशाणा साधला. पोलीस आयुक्तांसोबत (सीपी) झालेल्या बैठकीत स्वतः रोहित पवार यांनीच अध्यक्षांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे म्हटले होते. मग आता ते पुन्हा हा विषय कसा काय काढत आहेत, असा सवाल पडळकरांनी (Gopichand Padalkar) उपस्थित केला.

राज्य सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले. आम्हीही अनेक आंदोलने केली आहेत, मात्र पवार यांनी या आंदोलनाचा तमाशाचा फड करून टाकला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांची माथी भडकवणे थांबवावे, असेही ते म्हणाले.

यावेळी पडळकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचाही खरपूस समाचार घेतला. केंद्रातील सरकार कोसळणार या राऊतांच्या विधानावर टीका करताना ते म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून राऊत हेच म्हणत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. राऊत यांनी आधी आपण राज्यसभेवर निवडून येतो का, याची चिंता करावी, असा टोलाही पडळकरांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही