🕒 1 min read
बांगलादेश– जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयला (BCCI) कुणी आव्हान देईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) हे धाडस केलंय आणि तेही अत्यंत अपमानजनक भाषेत. “तुम्ही आमच्या एका खेळाडूला सुरक्षा देऊ शकत नाही, तर संपूर्ण टीमला काय वाचवणार?” असा खोचक सवाल करत बांगलादेशने बीसीसीआयची अक्षरशः खिल्ली उडवली आहे. या वादामुळे आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (T20 World Cup 2026) च्या आयोजनावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला खरेदी केलं होतं. पण देशातील राजकीय तणाव आणि बांगलादेशविरोधी वातावरण पाहता, बीसीसीआयने त्याला आयपीएल खेळण्यापासून रोखलं. या एका निर्णयाने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा ईगो दुखावला गेला आणि त्यांनी तातडीने एक ‘इमर्जन्सी मिटिंग’ बोलावली.
“एकाला वाचवू शकत नाही, तर १५ जणांचं काय?” या बैठकीनंतर बीसीसीआयवर ताशेरे ओढताना संचालक खालिद मशूद पायलट (Khaled Mashud Pilot) यांनी अत्यंत बोचरी टीका केली. ते म्हणाले, “जर भारत आमच्या एका खेळाडूला (मुस्तफिजुर) सुरक्षा पुरवू शकत नसेल, तर आमच्या १५ खेळाडूंच्या संपूर्ण टीमची सुरक्षा ते कशी करणार? त्यामुळेच आम्ही तिथे खेळायला जाणार नाही.”
फक्त टोमणे मारून बीसीबी थांबलं नाही, तर त्यांनी थेट आयसीसीला (ICC) पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात बांगलादेशचा संघ भारतात सुरक्षित नाही, त्यामुळे आमचे सर्व सामने सह-यजमान असलेल्या श्रीलंकेत हलवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पाकिस्तानप्रमाणेच आता बांगलादेशनेही भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर अविश्वास दाखवल्याने बीसीसीआयची चांगलीच कोंडी झाली आहे. कोलकाता आणि मुंबईत होणाऱ्या सामन्यांवर आता अनिश्चिततेचे सावट आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “गंभीरला वेळ नसेल तर लक्ष्मणला आणा…”; शुभमन गिल आक्रमक, बीसीसीआयसमोर मांडली ‘ही’ मोठी अट!
- धावपळ जिवावर बेतली! ‘ऑरेंज कॅप’ विनर साई सुदर्शनला गंभीर दुखापत; विजय हजारे ट्रॉफीतून बाहेर, IPL खेळणार का?
- ‘बांगलादेश म्हणजे पाकिस्तान नव्हे…’; मुस्तफिजुरच्या ‘एक्झिट’वरून शशी थरूर भडकले, बीसीसीआयला सुनावले खडे बोल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









