🕒 1 min read
मुंबई – पडद्यावर खळखळून हसणारी आणि जगाला हसवणारी ‘ती’ नेहमीच आनंदी दिसते, पण या हसऱ्या चेहऱ्यामागचं सत्य अत्यंत वेदनादायी आहे. ‘कपिल शर्मा शो’च्या खुर्चीत बसून दिलखुलास दाद देणाऱ्या अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) बाबत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या विनोदी शैलीने सर्वांना गुदगुल्या करणाऱ्या अर्चना सध्या एका अशा गंभीर आजाराचा सामना करत आहेत, ज्यावर औषधोपचारही हतबल ठरले आहेत.
खुद्द अर्चनाचा मुलगा आयुष्मान सेठी यानेच आपल्या आईच्या या दुर्मिळ आजाराचा खुलासा केला आहे. आयुष्मानने एका व्लॉगमध्ये जे सांगितलं, ते ऐकून चाहत्यांनाही धक्का बसलाय. आयुष्मान म्हणाला, “माझ्या आईसाठी गेलं वर्ष खूप कठीण होतं. तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं, पण त्यासोबतच तिला CRPS (Complex Regional Pain Syndrome) या दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे या आजारामुळे अर्चनाचा हात आता कधीच पूर्वीसारखा होऊ शकणार नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.
Archana Pooran Singh
इतक्या वेदना असूनही अर्चना थांबली नाही. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, या आजारपणातही तिने २-३ सिनेमे आणि एका वेब सीरिजचं शूटिंग पूर्ण केलं. सलग ३० दिवस ती काम करत होती. वयाच्या ६० व्या वर्षी तिने यूट्यूब चॅनेल सुरू करून स्वतःला अपडेटेड ठेवलंय, हे सांगताना आयुष्मानलाही गहिवरून आलं. मुलाचं हे प्रेम आणि कौतुक पाहून अर्चनाच्या डोळ्यांतही पाणी तरळलं.
‘राजा हिंदुस्तानी’, ‘कुछ कुछ होता है’ पासून ते आताच्या रियालिटी शोपर्यंत अर्चनाने नेहमीच आपल्या बिनधास्त स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘श्रीमान श्रीमती’ मधील तिची भूमिका आजही लोक विसरले नाहीत. मात्र, आज ती ज्या वेदनेतून जातेय, ते पाहून चाहत्यांकडून तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विराटचा ‘तो’ निर्णय पाहून चाहते हैराण; न्यूझीलंड सीरीजआधी सोशल मीडियावर काय घडलं?
- “सत्ता सोडणार का?” प्रश्नावर अजितदादांनी थेट सुनावलं; म्हणाले, “तुम्ही का आम्हाला…?”
- समोर क्रिकेटचा स्कोअरबोर्ड आणि राज ठाकरेंचं ‘ते’ चॅलेंज; १०० चा आकडा मागत म्हणाले, “खड्ड्यात उभा करून मारेन!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










