Share

‘देवाभाऊ’ नाही, हे तर ‘मेवाभाऊ’!; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर सडकून प्रहार

उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘मेवाभाऊ’ असा करत जोरदार हल्लाबोल केला. “हे लोक शहराला विनाशाकडे नेत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

Published On: 

uddhav thackeray and devendra fadnavis

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर: राजकारणात टीका-टिपण्णी चालतच असते, पण आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जी ‘उपमा’ दिलीये, ती ऐकून भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकली असेल. महायुतीच्या ‘डबल इंजिन’ सरकारवर हल्लाबोल करताना ठाकरेंनी थेट “हे देवाभाऊ नाही, तर मेवाभाऊ आहेत,” असा शालजोडीतला टोला लगावत राजकीय वातावरण तापवलं आहे.

Uddhav Thackeray slams BJP Devendra Fadnavis

“शहराला विनाशाकडे नेणारे ‘मेवाभाऊ’…”

संभाजीनगरमधील होर्डिंगबाजी आणि रखडलेल्या विकासावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले, “शहरात प्रशासकांचं इंजिन आहे, वर डबल-ट्रिपल इंजिन आहे, तरीही विकास कुठेय? हे लोक इतके निर्लज्ज आहेत की शहराची वाट लावली. हे ‘मेवाभाऊ’ (Devendra Fadnavis) शहराला विकासाकडे नाही, तर विनाशाकडे नेत आहेत.” देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) नाव न घेता, पण थेट त्यांच्या ‘देवाभाऊ’ प्रतिमेला छेद देणारा हा वार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर बोलताना ठाकरे काहीसे भावूक झाले. “मी मुख्यमंत्री असताना पाणी योजनेसाठी फक्त निधीच दिला नाही, तर महापालिकेकडे पैसे नाहीत हे समजताच ती योजना राज्य सरकारने स्वतःकडे घेतली होती. पण आज त्याच शहरात शिवसेनेचा पराभव होतो, हे शल्य मला आहे,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. “बाळासाहेबांचं ज्या शहरावर अपार प्रेम होतं, तिथेच आपण हरलो,” हे वाक्य शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले.

“पैसे घेऊन आला असाल तर हात वर करा!” गर्दीकडे बोट दाखवत ठाकरेंनी भाजपच्या ‘पॅकेज’ संस्कृतीवरही निशाणा साधला. “हे मैदान प्रेमाने भरलंय. इथे एक जरी माणूस पैसे घेऊन आला असेल, तर त्याने हात वर करावा. टीव्हीवाल्यांनो, त्याची मुलाखत घ्या,” असं खुलं चॅलेंजच त्यांनी दिलं. ही निवडणूक आमच्या अस्तित्वाची नाही, तर तुमच्या आयुष्याची आहे, असं सांगत त्यांनी मतदारांना साद घातली.

आता या ‘मेवाभाऊ’ उपाधीला फडणवीस काय उत्तर देतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या