रोहित पवार हेच तर सूत्रधार नाहीत ना? त्यांचीच चौकशी करा; आमदार देवयानी फरांदे यांची मागणी

अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यानंतर, भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी रोहित पवार हेच सूत्रधार असल्याचा संशय घेत चौकशीची मागणी केली आहे.

Published On: 

Devyani Farande demands inquiry of Rohit Pawar in Ajit Dada case

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: अजितदादा यांच्या विमान अपघाती निधनाला साडे नऊ महिने पूर्ण झाले असूनही या प्रकरणाचा तपास अद्याप झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, अजितदादांच्या मृत्यूमागे आमदार रोहित पवार हेच सूत्रधार नाहीत ना? अशी शंका उपस्थित करत त्यांचीच चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.

शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच एका प्रेझेंटेशनद्वारे या प्रकरणातील संशयितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवत असल्याचा सवाल उपस्थित केला होता. ‘व्हीएसआर’ विमान कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंग यांची चौकशी केली जात नाही, तसेच त्यांच्यावर एफआयआर दाखल न करता त्यांना वाचवले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यावरून भाजपा नेत्यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

अजितदादांच्या अपघातामागे फडणवीस आहेत असे आपण म्हणत नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस हे कंपनी मालकाच्या मुलांच्या लग्नाला उपस्थित होते आणि त्यांचे चांगले संबंध असल्याचा दावा करत, फडणवीस हेच त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या आरोपांना प्रत्युत्तर देताना आमदार देवयानी फरांदे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला. अजितदादा गेल्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यावरून आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे फरांदे म्हणाल्या. रोहित पवार यांना त्यांचे काका अजितदादांची जागा घेण्याची घाई झाली असून त्यासाठीच त्यांचा हा आटापिटा सुरू आहे. मात्र राजकारणात जनताच जागा देत असते, ती कोणालाही परस्पर घेता येत नाही, असा टोलाही फरांदे यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही