मुंबई, 18 नोव्हेंबर: महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत राज्यातील तीन वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांबाबतचे अधिकृत आदेश सरकारकडून काढण्यात आले असून, या अधिकाऱ्यांवर आता मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागात (मंत्रालय, मुंबई) प्रशासकीय नाविन्य, उत्कृष्टता आणि सुशासन या विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणारे अतुल निळकंठ पाटणे यांची आता बदली झाली आहे. शासनाने त्यांची नियुक्ती मंत्रालयात वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिवपदी केली आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात सचिव (वस्त्रोद्योग) पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती शैला ए. यांच्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाने त्यांची बदली महिला व बालविकास विभागाच्या सचिव (मंत्रालय, मुंबई) म्हणून केली आहे.
तसेच, श्रीमती स्वाती योगेश म्हसे पाटील यांच्या १७.०८.२०२६ रोजीच्या पदस्थापनेच्या आदेशात अंशतः बदल करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती आता मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात सचिव या पदावर करण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








