ऐन दिवाळीत शहापूर मानेगाववर शोककळा; देवदर्शनाहून परतताना भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

मढी-मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाहून परतताना शेवगाव-पैठण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत शहापूर मानेगाव येथील परमेश्वर सोलाट आणि दादासाहेब मतकर या दोन तरुणांचा मृत्यू झाला.I

Published On: 

Shevgaon Paithan Accident: देवदर्शनाहून परतताना दोघांचा मृत्यू

पैठण, ९ नोव्हेंबर, किरण काळे पाटील : शहापूर मानेगाव (ता. पैठण) येथील दोन तरुणांचा शेवगाव-पैठण महामार्गावरील तळणी शिवारात रविवारी (८ नोव्हेंबर) अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. परमेश्वर चांगदेव सोलाट (३७) आणि दादासाहेब सर्जेराव मतकर (३६) अशी मृतांची नावे आहेत. ऐन दिवाळीत एकाच गावातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिवाळी आणि सोमवती अमावस्येचे औचित्य साधून हे दोघे मित्र मढी येथील कानिफनाथ आणि सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बजाज सिटी-१०० दुचाकीने गावाकडे परतत असताना, सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास तळणी (ता. शेवगाव) शिवारात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी दोघांनाही शेवगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी परमेश्वर सोलाट यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या दादासाहेब मतकर यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली.

सोमवारी (९ नोव्हेंबर) शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर शहापूर मानेगाव येथील एकाच स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

परमेश्वर सोलाट यांनी अपघाताच्या दिवशीच ठेवलेले व्हॉट्सॲप स्टेटस आता त्यांचे अखेरचे स्टेटस ठरले आहे. ‘दिवाळीचा पहिला दिवा नाथ बाबा घरी तुम्ही यावा अन् सारं काही आनंदी आनंद व्हावा…’ आणि ‘डर नहीं लगता मुझे किस बात का, सर पे मेरे साया है बड़े बाबा मच्छिंद्रनाथ का’ असे व्हिडिओ आणि फोटोचे स्टेटस त्यांनी ठेवले होते.

या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत परमेश्वर सोलाट यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, दोन भाऊ आणि आई-वडील असा परिवार आहे. तर दादासाहेब मतकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक भाऊ आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही